पुण्यातील तडीपार गुंडाला आगाशिवनगरात अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कऱ्हाड - पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या प्रतीक प्रकाश तापकीर (वय 24, रा. लांडगे आळी, भोसरी) या गुंडाला आगाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथे अटक झाली. त्याच्याकडून सुमारे 50 हजारांचे परदेशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन, चार काडतुसे असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्यावर पुण्यात खुनासह खंडणी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. 

पोलिसांनी सांगितले, की प्रतीक तापकीर पुणे जिल्ह्यातून तडीपार आहे. तो विद्यानगर भागात राहण्यास आला होता. त्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे हवालदार सतीश जाधव यांना मिळाली. त्यांनी ती माहिती सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी आणि प्रमोद जाधव यांना दिली. त्यानुसार दोन दिवस पोलिस त्याच्या मागावर होते. त्यानुसार तो काल आगाशिवनगर येथे इंद्रप्रस्थ कॉलनीतील एका ढाब्यावर जेवणासाठी येणार असल्याची माहिती हवालदार जाधव यांना समजली. त्यानंतर तेथे सापळा रचण्यात आला. 

प्रतीक तापकीर रात्री दहाच्या सुमारास ढाब्यावर आला. पोलिसही साध्या वेशात ढाब्यावर पोचले. तापकीरच्या चाणाक्ष नजरेने ते पोलिस असल्याचे हेरले. तो तेथून पळून निघाला. मात्र, पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. झडती घेतली असता त्याच्या कंबरेला विदेशी बनावटीचे मॅगझीनसह पिस्तूल सापडले. त्यात चार जिवंत काडतुसेही होती. पन्नास हजारांचा मोबाईल आणि तीन हजार रुपयेही त्याच्याकडे सापडले. प्रतीकवर पाच गुन्हे आहेत. त्यात दोन खुनाचे आहेत. 

म्हणे संरक्षणासाठी पिस्तूल... 
प्रतीकला पोलिसांनी पकडले त्यावेळी तो शांत झाला. त्याने पोलिसांच्या प्रश्‍नांना तितक्‍याच शांतपणे उत्तरे दिली. पिस्तूल कशासाठी ठेवले आहे, असा प्रश्‍न विचारताच त्याने "स्वसंरक्षणासाठी' असे उत्तर दिले. परवाना आहे का, असे विचारताच त्याने "नाही', असे उत्तर दिले.

Web Title: Banished gangster arrested