नोटबंदीच्या त्रासाविरोधात आता बँक कमर्चाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

कोल्हापूर : नोटबंदीमुळे सध्या बँक कमर्चाऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध बँकाचे 40 हजार बँक कर्मचारी 10 डिसेंबरपासून (शनिवार)आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी शुक्रवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर : नोटबंदीमुळे सध्या बँक कमर्चाऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध बँकाचे 40 हजार बँक कर्मचारी 10 डिसेंबरपासून (शनिवार)आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी शुक्रवारी (ता. 9) पत्रकार परिषदेत दिली. 

तुळजापूरकर म्हणाले, "पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांवर अचानक ताण आला आहे. बँकांच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता थेट शासकीय धोरणे ठरविणे, अंमलबजावणीच्या अडचणींची फारशी चर्चा न करणे यामुळे ग्राहक व बँक कर्मचाऱ्यांत दररोजचा संघर्ष होत आहे. रोज धोरणे बदलणे व त्या प्रमाणात चलन पुरवठा न करण्याच्या पद्धतीमुळे काम करणे अशक्‍य बनले आहे. पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा पेट्रोल मेडिकलमध्ये चालतात पण जिल्हा बॅकेत चालत नाहीत. याचा मोठा ताण सहकारी बँकेवर येत आहे. 
आठवड्याला चोवीस हजार बचत खात्यातून, तर पन्नास हजार चालू खात्यावर रक्कम मिळण्याची घोषणा करणे व तितकी रक्कम बँकाना न देणे अशा प्रकारांमुळे रक्कम वाटप करताना बँक कर्मचाऱ्यांना मोट्या तणावात काम करावे लागत आहे. 

एकीकडे बँका थकबाकीत असताना ही नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. सर्वच ठिकाणी कॅशलेसची सुविधा राबविणे अशक्‍य आहे. यामुळे ग्रामीण जनता भरडली जात आहे. सहकार बचाव करण्यासाठी बँक कमर्चाऱ्याबरांबरीर नागरिकांनी उठाव करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. याचाच भाग म्हणून 10 डिसेंबरपासून आम्ही आंदोलन करीत आहोत. पहिल्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी, संबधित मंत्री यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर काळ्या फिती लावून काम करून आम्ही जनतेच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून देणार आहोत. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉयी युनियन (कोल्हापूर) गुरुनाथ मजूमदार उपस्थित होते.
 

Web Title: bank employees agitation against note ban