बँक मित्राचे भविष्य अंधारातच..?

बँक मित्राचे भविष्य अंधारातच..?

भोसे - जनधन योजनेच्या माध्यमातून बँक खातेदाराला विविध योजना देऊन खातेदारांना आधार दिला. पण अंमलबजावणीसाठी बँकेच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या बँक मित्रालाच भविष्य नसल्याने त्यांच्या भविष्यात मात्र अंधार निर्माण झाला.

ग्रामीण भागातील दोन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात राष्ट्रीयकृत बँकेला शाखा उघडून त्यावर होणारा खर्च परवडत नसल्यामुळे बँकेने त्याच गावातील सुशिक्षित तरुणाला बँक मित्र म्हणून नियुक्त केले. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ठराविक स्वरूपात मानधन होते व केलेल्या आर्थिक उलाढालीवर कमिशन दिल्याने त्याचे कुटुंब बऱ्यापैकी चालत होते परंतु याची व्याप्ती आणि प्रमाण वाढल्यावर मित्रांच्या सुरक्षिततेबाबत बँकेने विचार न करता निश्चित केलेले मानधन बंद करून टाकले आणि यावर होणाऱ्या टक्केवारी देखील कमी करून टाकले. बँक मित्राकडून जनधन बॅक खाती, आधार लिंक, मोबाईल क्रमांक, जोडणे, थकीत कर्ज वसुली, ठेवी यासह बॅकेची बहूतांश कामे बँक मित्र अंगावर टाकून त्यांच्याकडून करून घेण्याचा सपाटा लावला. पण त्या बदल्यात योग्य मोबदल दिला नाही त्यामुळे योजनेचा प्रभाव वाढूनही आणि त्याच्या भविष्यात मात्र अंधार करून ठेवला. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ,अटल पेन्शन योजना या योजनेची ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत अंमलबजावणी करण्याचे उदिष्ट बँक मित्रा वर सोपवण्यात आले व त्यासाठी ठराविक दिवशी अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी आणण्याची सक्ती देखील करण्यात आली. यात काम न करणाऱ्या बँक मित्रांना तंबी देण्यात आली याशिवाय बँकेने दिलेल्या पण वसुली न होणाऱ्या कर्जाच्या वारंवार भेट घेऊन वसुलीची तंबी देण्यात आली यासाठी काहीच मोबदला नाही कर आणि पैसे भरले तर टक्केवारी कमिशन होते. परंतु, याची व्याप्ती वाढली ग्रामीण भागातील अशिक्षित घरापर्यंत बँकिंग सेवा केली. याचे श्रेय घेतले त्यासाठी कष्ट घेतले. बँक मित्र बँकेने वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. 

जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँक अलाबाद बँक, सिंडिकेट बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बॅक, याचा आणि राष्ट्रीयत्व व प्रादेशिक ग्रामीण बँकानी जिल्ह्यात ही सुविधा बँक मित्रा माध्यमातून त्यांची ही कामे करून घेतली पण भविष्यात मात्र अंधार निर्माण करून ठेवला आहे. अलीकडच्या काळात काही बँकांनी कंपनीची नियुक्ती करून त्या माध्यमातून सेवा देऊन बँक मित्रांना आता वाऱ्यावर सोडण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने धोरण हे गरज सर्च वैद्य मरो असे केले. प्रशासनाच्या सोयीसाठी बॅक मित्राशी केलेल्या कराराचा गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत.

ग्रामीण भागात वसुलीसाठी गेल्यावर कर्जदाराकडून अपशब्द आणि त्याच्या पाळीव कुत्र्याचाही सामना करावा लागतो.बॅक मित्रामुळे बँकीग सेवा घरोघरी गेल्याने बँकेतील गर्दी कमी झाली. प्रशासन मात्र बँक मित्राचा कामापुरता वापर करीत आहे बँक मित्राला बँकिंग सेवेत सामावून घेण्याची गरज आहे.
अमोल जाधव , बँक मित्र विदर्भ कोकण ग्रामीण बँक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com