करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे छत कोसळले

Bank of Maharashtra slab collapsed at Karmala
Bank of Maharashtra slab collapsed at Karmala

करमाळा : येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. छताच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भिती आहे. आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे हलवले आहे. आणखी 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली आडकल्याची भीती आहे.

सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे. दुर्घटना घडली तेव्हा बँकेत 50 पेक्षा जास्त लोक होते. जेसीबी, क्रेनच्या मदतीने अडकलेले लोक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बँक तळमजल्यावर असून वरती दवाखाना आहे. दवाखान्याच्या पुढील बाजुचे स्लॅब कोसळून हा अपघात झाला आहे. 

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com