सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष न्हावकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जिल्हा न्यायालय आवारातील बार असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत एक हजार 134 पैकी 975 वकील मतदारांनी मतदान केले. सायंकाळी पाचनंतर मतमोजणीला सुरवात झाली. रात्री साडेदहाच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोष केला. न्हावकर यांच्या विधी विकास पॅनेलचे दोन उमेदवार, फताटे यांच्या विधी सेवा पॅनेलमधील तीन उमेदवार विजयी झाले. सुरेश गायकवाड यांच्या जनसेवा पॅनेलचा धुव्वा उडाला. 

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीत अध्यक्षपदी विधी विकास पॅनेलचे संतोष न्हावकर यांनी विजय मिळविला. सहसचिवपदी विधी विकास पॅनेलच्या स्वप्नाली चालुक्‍य, उपाध्यक्षपदी विधी सेवा पॅनेलचे संतोष पाटील, सचिवपदी संतोष होसमनी, खजिनदारपदी महेंद्र वड्डेपल्ली निवडून आले आहेत. सहसचिव चालुक्‍य यांना सर्वाधिक 753 मते मिळाली. 

जिल्हा न्यायालय आवारातील बार असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत एक हजार 134 पैकी 975 वकील मतदारांनी मतदान केले. सायंकाळी पाचनंतर मतमोजणीला सुरवात झाली. रात्री साडेदहाच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोष केला. न्हावकर यांच्या विधी विकास पॅनेलचे दोन उमेदवार, फताटे यांच्या विधी सेवा पॅनेलमधील तीन उमेदवार विजयी झाले. सुरेश गायकवाड यांच्या जनसेवा पॅनेलचा धुव्वा उडाला. 

उमेदवार आणि मिळालेली मते : अध्यक्ष : विधी विकास पॅनेलचे संतोष न्हावकर (विजयी 394), विधी सेवा पॅनेलचे राजेंद्र फताटे (280), जनसेवा पॅनेलचे सुरेश गायकवाड (268), स्वतंत्र उमेदवार डी. बी. आगासे (24). 

उपाध्यक्ष : विधी सेवा पॅनेलचे संतोष पाटील (विजयी 401), विधी विकासचे विद्यावंत पांढरे (376), जनसेवा पॅनेलचे शिरीष नंदीमठ (169), स्वतंत्र उमेदवार पी. बी. गायकवाड (22). 

सचिव : विधी सेवा पॅनेलचे संतोष होसमनी (विजयी 530), विधी विकास पॅनेलचे रियाज शेख (346), जनसेवा पॅनेलचे संजय मंटगे (97). सहसचिव : विधी विकास पॅनेलच्या स्वप्नाली चालुक्‍य (विजयी 753), विधी सेवा पॅनेलच्या शाहीन शेख (201). 
खजिनदार : विधी सेवा पॅनेलचे महेंद्र वड्डेपल्ली (विजयी 388), जनसेवा पॅनेलचे दयानंद माळी (337), विधी विकास पॅनेलचे तानाजी शिंदे (240).

Web Title: bar association election in Solapur