Indian Army Soldier: बेळगावच्या जवानाचा राजस्थानात अपघाती मृत्यू

राजस्थानमधील मद्रास अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये पोस्टिंगसाठी गेले होते.
Ballapa Mohite
Ballapa MohiteEsakal

बेळगाव : राजस्थानच्या (Rajasthan) मद्रास (Madras) रेजिमेंटच्या बाडमेर लष्करी कॅम्पमध्ये झालेल्या वाहन अपघातात (इदलहोंड ता. बेळगाव) (Belguam) रहिवासी असलेल्या बाळाप्पा तानाजी मोहिते (वय ३२) (Ballapa Mohite) या लष्करी जवानाचा मृत्यू झाला आहे. नुकतीच हवालदारपदी बढती होऊन तो राजस्थानमधील मद्रास अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये पोस्टिंगसाठी गेले होते. शुक्रवार (ता.३१) रात्री ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Rajasthan Madras Regiment Badmer Military Camp)

बाळाप्पा मोहिते यांचा जन्म २५ जुलै १९८९ रोजी बेळगाव शहरापासून २५ किमी अंतरावरील ओल्ड इदहोंडा गावात मराठा समाजातील प्रतिष्ठित मोहिते कुटुंबातील जन्म झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी नर्मता, ५ वर्षांचा मुलगा विनीता, भाऊ महादेव आणि बहीण लक्ष्मी असा परिवार आहे.

१३ वर्षे लष्करात..

बाळाप्पा मोहिते यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण अगसगे गावातील हायर प्राथमिक शाळेत झाले. बेळगावात त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सैन्यात सेवा केलेल्या काकांच्या प्रेरणेने ऑगस्ट २००९ मध्ये सैन्यात दाखल झाले. त्यांनी मद्रास रेजिमेंटमध्ये येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध पोस्टिंगवर काम केले. अलीकडे, त्यांनी मद्रास ग्रुप ऑफ इंजिनियरिंग रेजिमेंट, बाडमेर, राजस्थान येथे हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम केले.

उद्या अंत्यसंस्कार

या दिवंगत लष्करी जवानाच्या पार्थिवावर उद्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस, पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरागोप्प यांच्याशी ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार करण्याबाबत चर्चा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com