बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा तिढा सुटला

सुदर्शन हांडे
मंगळवार, 10 जुलै 2018

बार्शी - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निर्माण झालेली त्रिशंखु परिस्थितीचा तिढा अखेर सुटला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत व भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना बाजार समितीत एकत्र येण्याच्या सूचना केल्या आहेत.

बार्शी - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निर्माण झालेली त्रिशंखु परिस्थितीचा तिढा अखेर सुटला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत व भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना बाजार समितीत एकत्र येण्याच्या सूचना केल्या आहेत.

थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर प्रथमच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांच्या शेतकऱ्यांची बाजार समिती वाचवा आघाडी, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडी व भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांच्या बार्शी तालुका शेतकरी विकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली होती. शेतकरी गणातील १५ जागा तर हमाल-तोलर, व्यापारी-आडत्या गणातील तीन आशा एकूण आठरा जागी ही निवडणूक झाली होती. यात राऊत गटाने शेतकरी गणातील १५ पैकी ९ जागावर विजय मिळवत बाजार समितीवर वर्चस्व मिळवले होते. तर सोपल गटाने शेतकरी गणातील ६ व हमाल-तोलर गणातील एक आशा सात जागा मिळवल्या होत्या. मिरगणे गटाने व्यापारी-आडत्या गणातील दोन जागेवर विजय मिळवला होता. 

राऊत गटाने वर्चस्व मिळवूनही बहुमताचा आवश्यक दहा जागा नसल्याने सत्ता स्थापनेत अडचण निर्माण झाली होती. मिरगणे गट कोणाला पाठिंबा देणार यावर पुढील घडामोडी अवलंबून होत्या. बाजार समिती संचालका मधील हमाल, व्यापारी गणातील संचालक चेअरमन होऊ शकत नाहीत असा नियम आहे. यामुळे त्रिशंखु स्थितीत मिरगणे गटाकडे सत्तेच्या चाव्या होत्या पण त्या दुसऱ्यांकडे द्याव्या लागणार हे निश्चित होते. करण मिरगणे यांचे दोन्ही उमेदवार व्यापारी गणातून निवडून आले असल्याने कोणत्याही पदावर त्यांना दावा सांगता येत नव्हता. 

राऊत-मिरगणे हे दोन्ही भाजपचे नेते असले तरी माजी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गटाचे तर राजेंद्र मिरगणे हे सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे समर्थक मानले जातात. दोन्ही नेत्यांत टोकाचा राजकीय वाद आहेत. यामुकेच बाजार समिती चेअरमन निवडीत काय होणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर भाजपच्या दोन्ही राऊत-मिरगणे या नेत्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून या ठिकाणी झालेल्या चर्चेत त्यांनी बार्शी बाजार समितीचा प्रश्न मिटवला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बरबोले, नूतन संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते. नागपूर येथील बैठकीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होताच 'इंद्र'दरबारी प्रश्न सुटला असल्याची प्रतिक्रिया बार्शीकरांनी व्यक्त केली. 

Web Title: The Barshi Agriculture Produce Market Committee was relinquished