बार्शी : जोपसलेल्या द्राक्षे बागेस कुर्हाड लावावी

बाबासाहेब शिंदे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पांगरी - बार्शी तालुक्याचा पुर्वे व उत्तरेकडील भाग हा नेहमी द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर असताना मागील काही वर्षात अल्प झालेल्या पाऊसाच्या प्रमाणामुळे वर्षानुवर्ष जोपसलेल्या द्राक्षे बागेस कुर्हाड लावावी लागली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात द्राक्षाची जागा भाजीपाल्या पिकांने घेतली. मात्र त्यात ही खर्चाच्या मानाने उत्पादन आणि बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात ओढला गेला. यानंतर मात्र पुन्हा शेतकरी द्राक्षे बागेकडे ओळला असून, बाजारपेठेत ग्राहकांची मागणीनुसार नव्याने संशोधीत द्राक्षे पिकांची लागवड होऊ लागली आहे.

पांगरी - बार्शी तालुक्याचा पुर्वे व उत्तरेकडील भाग हा नेहमी द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर असताना मागील काही वर्षात अल्प झालेल्या पाऊसाच्या प्रमाणामुळे वर्षानुवर्ष जोपसलेल्या द्राक्षे बागेस कुर्हाड लावावी लागली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात द्राक्षाची जागा भाजीपाल्या पिकांने घेतली. मात्र त्यात ही खर्चाच्या मानाने उत्पादन आणि बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात ओढला गेला. यानंतर मात्र पुन्हा शेतकरी द्राक्षे बागेकडे ओळला असून, बाजारपेठेत ग्राहकांची मागणीनुसार नव्याने संशोधीत द्राक्षे पिकांची लागवड होऊ लागली आहे.

द्राक्षासाठी पुरेसे पाणी नसताना देखील जेमतेम पाण्याच्या आधारावर लागवड करून उन्हाळ्याच्या दिवसात विहीरी, विंधन विहीरीचा घेऊन जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत पुरत होते. तेच आता जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बंद पडले आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर असताना उत्पादीत केलेल्या द्राक्षेस खर्चाच्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकरी कोलमडला जात आहे. उत्पादन करणे आपल्या हातात आहे. मात्र त्यास योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक गणिते कोलमडत आहे.

सध्या द्राक्षे विक्रीचा हंगामात नुकतीच सुरूवात होऊ लागली असताना वातावरणात वेळोवेळी निर्माण होत असलेला गारठ्यामुळे द्राक्षास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत नाही. सन 1990 दशकात पांगरीसह, कारी, नारी, गोरमाळे, जहानपूर, ममदापूर, पांढरी, शिराळे, पाथरी, चिंचोली आदी गावच्या परिसरात द्राक्षेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. यात पुर्वीच्याच द्राक्षेच्या जाती थॉमसन, माणिकचमन, शरद सिडलेस, सुपर सोनाका या प्रमुख द्राक्षे जातीसह अन्य द्राक्षेची लागवडीतून उत्पादन घेतले जात होते. यात त्याकाळात ही निर्यातक्षम द्राक्षे उत्पादन करून निर्यात होत होती. त्यामुळे शेतकर्यांना फायदेशीर ठरत होती. मात्र दिवसेंदिवस पाऊसाचे प्रमाणात कमी राहिल्याने, अवेळी पाऊस,वातावरणातील बदल, पाण्याची कमतरता यामुळे द्राक्षे क्षेत्र झपाट्याने कमी झाले. 

या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये भाजीपालासह वेलवर्गीय पिके घेण्यावर भर दिला. यात ही खर्चाच्या मानाने उत्पादनास भाव मिळत नसल्याने शेतकरी खचला जाऊ लागला.द्राक्षे बागेसारख्या बहुवर्षिक पिकाकडे कर वाढला आहे.यामध्ये सुधारीत जातीच्या द्राक्षे पिकांचा शोध घेत लागवडी होऊ लागल्या आहेत. या जातीचे वाण उत्पादनास चांगले व दर्जेदार असल्याने किफायदेशीर ठरू पाहत आहेत. यामध्ये आर.के, एस.एस.एन, धनाका, आनुश्का या नव्याने द्राक्षे वाणची शेतकरी लागवड करू लागला आहे. या दोन वर्षांच्या कालवधीत अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षे लागवड केली असून हळूहळू यात वाढ होत असलेले चित्र दिसू लागले आहे. यात मागील दशकात कारी परिसरात जवळपास सातशे एकरावर असलेली द्राक्षे पाणी अभावी बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली होती. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून पुन्हा शेतकरी द्राक्षे लागवडीमध्ये गुंतला असून आता नव्याने जवळपास दीडशे ते दोनशे एकरावर लागवड झाली आहे. या बागाची मशागतीत यंत्रीककरणाचा वापर होऊ लागला असून, मजूरीवर मात करत ट्रॅक्टरच्या सह्याने बागेमध्ये फवारणी केली जात आहे.त्यामुळे मजूरीमध्ये बचत होऊ लागली आहे. यात एकरी फवारणीसाठी हजार रूपये तर जी.ए.सारख्या संजीवकेच्या फवारणी अडीच हजार रूपये लागत आहेत.या ट्रॅक्टरव्दारे होणार्या फवारणीचा खर्चामध्ये हे बचत करण्यासाठी स्वतः ट्रॅक्टर खरेदीच्या मानसिकेत अनेक शेतकरी असल्याचे दिसून येत आहेत.याकरिता शासनाने छोटे ट्रॅक्टर शेतकर्यांना सवलतीच्या दारात उपलब्ध करून द्यावेत…अशी मागणी द्राक्षे बागायतदार लक्ष्मण बनसोडे यांनी सकाळशी बोलताना केली. 

यावर्षीचा दुष्काळ मागील दुष्काळच्या मानाने तीव्र आहे. मागील दुष्काळ परिस्थितीत मार्च, एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईस सामना करावा लागत होता. मात्र यावर्षी जानेवारी पासूनच पाण्याची पातळी कमी कमी होऊन अनेक विंधनविहीरी,विहीर कोरड्या पडल्या आहेत. या निर्माण झालेल्या स्थितीमुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. 

Web Title: Barshi: Applying the grapefruit grapes to the garden