द्राक्षबागेत फवारणीनंतर शेतकऱ्यांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

दिवसभर औषध लावताना शेतकऱ्यांच्या अंगावर हे औषध उतरल्याने त्वचेतून विषबाधा झाली. काम संपल्यानंतर रात्री उशिरा काही शेतकऱ्यांना त्रास जाणवू लागल्याने बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या द्राक्षबागेत हे औषध लावण्यात आले, त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे

बार्शी - हिंगणी (ता. बार्शी) येथील एका द्राक्षबागेत औषध फवारणाऱ्या सात शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यातील चार शेतकरी अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

हिंगणी येथील शेतकरी आनंद काशीद यांची 19 एकर द्राक्षबाग आहे. ऑक्‍टोबर छाटणीनंतर द्राक्षकाडी फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईत हे कॅनब्रेक कंपनीचे औषध कापडाच्या साह्याने हाताने द्राक्षकाड्यांना लावण्यात येत होते. काशीद यांच्या शेतात शनिवारी औषध लावण्याचे काम 11 तरुण शेतकऱ्यांनी केले. दिवसभर औषध लावताना शेतकऱ्यांच्या अंगावर हे औषध उतरल्याने त्वचेतून विषबाधा झाली. काम संपल्यानंतर रात्री उशिरा काही शेतकऱ्यांना त्रास जाणवू लागल्याने बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या द्राक्षबागेत हे औषध लावण्यात आले, त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे.

Web Title: barshi news: farmers

टॅग्स