'माध्यमे ठरताहेत धार्मिक धुव्रीकरणाला आधारभूत'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

बार्शी - जागतिकीकरणामुळे नवे अवकाश प्राप्त झालेले असताना आपल्या देशातील माध्यमे मात्र जातीय आणि धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणास आधारभूत ठरत आहेत, अशी खंत साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली.

बार्शी - जागतिकीकरणामुळे नवे अवकाश प्राप्त झालेले असताना आपल्या देशातील माध्यमे मात्र जातीय आणि धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणास आधारभूत ठरत आहेत, अशी खंत साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली.

भगवंत मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने  झालेल्या व्याख्यानमालेत ‘जग बदलले, माध्यमेही बदलली’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. शिवशक्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे अध्यक्षस्थानी होते. या वेळी संयोजक संस्थांचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, सनदी अधिकारी अविनाश सोलवट, डॉ. प्रतापसिंह पाटील, उद्योजक महावीर कदम, गटविकास अधिकारी प्रमोद काळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आवटे म्हणाले, नव्या जगात माध्यमे आणि संवादाची परिभाषा बदलली आहे. आवाज नसलेल्या घटकांना अभिव्यक्ती मिळाली आहे. माहितीचे रूपांतर ज्ञानात आणि ज्ञानाचे शहाणपणात होणे गरजेचे आहे. मात्र, व्यवस्था आणि माध्यमे जनतेला ग्राहक बनवत आहेत. दांभिकता हे आपल्या व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असल्यामुळे सामाजिक दुभंगलेपण वाढले आहे. माध्यमांनी कोणाचे हस्तक व्हायचे, हे ठरविले पाहिजे. संवैधानिक नैतिकता माध्यमांनी विसरू नये. खुलेपणा हे नव्या जगाचे वैशिष्ट्य असूनसर्वसमावेशकताच महत्त्वाची आहे. 

ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उद्‌घाटक प्रतापसिंह पाटील, प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनीही शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.

Web Title: barshi news solapur media sanjay awate