स्वाइन फ्लूसदृश आजाराने बार्शीत महिलेचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

बार्शी - येथील शोभा अंबादास क्षीरसागर (वय 65) यांचे स्वाइन फ्लूसदृश आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. या घटनेनंतर बार्शी नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, बारबोले प्लॉट, शिवशक्‍ती मैदान परिसरातील सर्वच घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. क्षीरसागर यांना सर्दी, ताप, अंगदुखीमुळे मंगळवारी (ता.25) बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना बुधवारी (ता.26) सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले होते. नगराध्यक्ष ऍड.

बार्शी - येथील शोभा अंबादास क्षीरसागर (वय 65) यांचे स्वाइन फ्लूसदृश आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. या घटनेनंतर बार्शी नगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, बारबोले प्लॉट, शिवशक्‍ती मैदान परिसरातील सर्वच घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. क्षीरसागर यांना सर्दी, ताप, अंगदुखीमुळे मंगळवारी (ता.25) बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना बुधवारी (ता.26) सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले होते. नगराध्यक्ष ऍड. आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी आरोग्य अधिकारी, नगरपालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. 

Web Title: barshi news swine flu women

टॅग्स