राष्ट्रवादीला निष्ठावंताचाच रामराम; सोपल करणार 'जय महाराष्ट्र'?

प्रवीण डोके
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

रविवारी वर्षी येथील दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी सोपल यांच्या कुटुंबीय, प्रमुख कार्यकर्ते, बार्शी नगरपालिकांचे विरोधीपक्ष नेते यांच्यात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत राष्ट्रवादीतून दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा की नाही. या संदर्भात बैठक पार पडली.

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे माजी मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत जाणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

रविवारी वर्षी येथील दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी सोपल यांच्या कुटुंबीय, प्रमुख कार्यकर्ते, बार्शी नगरपालिकांचे विरोधीपक्ष नेते यांच्यात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत राष्ट्रवादीतून दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा की नाही. या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करावा ही भूमिका मांडली.

तर दुसरीकडे पुण्यात बार्शी येथून व्यवसाय, नोकरीसाठी असलेल्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा दिलीप सोपल यांनी पिंपरी चिंचवड घेतला आहे. त्यावेळी सोपल म्हणाले, सगळ्याच पक्षातून मला ऑफर आहे. त्या संदर्भात मी आपले मत जाणून घ्यायला आलो आहे. मी कोणत्या पक्षांमुळे नाही तर बार्शिकरांच्या प्रेमामुळे आमदार झालो आहे.

यावेळी बैठकीतूनच सोपल यांनी फोन लावण्यात आला. बैकितील कार्यकर्त्यांची भूमिका त्यांना सांगण्यात आली. तुम्ही सर्व कार्यकर्ते जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो. त्यामुळे दिलीप सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहे. 

बैठकीनंतर शहरातील आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी " मग कस, जय महाराष्ट्र, निघाला वाघ मुंबईला" या पोस्ट Facebook, WhatsApp वरती फिरत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barshis NCP MLA Dilip Sopal may be entered Shivsena