सांगलीत उद्यापासून बसव महोत्सव

सांगलीत उद्यापासून बसव महोत्सव

सांगली - महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त ता. १ ते ७ मे अखेर श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये बसव व्याख्यानमाला, ग्रंथ पारायण, रुद्राभिषेक, महात्मा बसवेश्वर जन्मकाळ आणि मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित केल्याचे बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामभाऊ पैलवान यांनी सांगितले. 

सिंहासने म्हणाले,‘‘गुरुवारपासून बसव महोत्सव सुरू होत आहे. १ ते ५ मे दरम्यान दररोज सकाळी ७ ते ८ यावेळेत ग्रंथ पारायण (बसवतत्त्व वचन पारायण) होणार आहे. दुपारी ४.३० ते ६ वाजेपर्यंत रुद्र शिक्षण व ५ मे रोजी शिवयोग ध्यान साधना होणार आहे. 

१ ते ७ मे अखेर सायंकाळी ६ वाजता बसव व्याख्यानमाला होणार आहे. यामध्ये एक मे रोजी डॉ. प्रदीप पाटील (मनोआरोग्य व अंधश्रद्धा, चमत्कार यासंदर्भात प्रात्यक्षिके), २ रोजी ईश्वर रायण्णावर (वीरमाता श्री अक्कमहादेवी), ३ रोजी श्रीकांत माळकर (तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार), ४ रोजी चनवीर  मठ (विश्वगुरू महात्मा बसवेश्वर), ५ रोजी ताज मुलाणी (समाजातील ढासळती नीतिमूल्ये), ६ रोजी प्रा. डॉ. प्रीती शिंदे (स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी) आणि अक्षय्य तृतीयेला ७ मे रोजी प्रा. सुधीर गाडे (चीनचे आव्हान व स्वदेशी) यांचे व्याख्यान होणार आहे. 

अक्षय्यतृतीयेला बसव जन्मदिनी सनईचौघडा वादन, पारायण, रुद्राभिषेक, वरदशंकर महापूजा, भजन तसेच १२ वाजता जन्मकाळ होणार आहे. सायंकाळी बोर्डिंगभोवती मिरवणुकीने महोत्सवाची सांगता होईल. याशिवाय ५ ते ७ मे या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com