सूर्यवंशी मळा, बारा डबरीसह शिक्षक कॉलनीत असुविधा

सूर्यवंशी मळा, बारा डबरीसह शिक्षक कॉलनीत असुविधा

कऱ्हाड ः पूर्वी सगळा भाग त्रिशंकूमध्ये येत होता. त्यावेळी जी स्थिती या भागाची होती, त्याच यातना सूर्यवंशी मळा, बारा डबरीसह शिक्षक कॉलनीत आजही सोसाव्या लागत आहेत. पालिकेच्या हद्दीत समाविष्ट होवून त्या भागाला दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही त्या भागाला सुविधांसाठी पालिकेने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सूर्यवंशी मळा, बारा डबरी, शिक्षक कॉलनीसह त्या भागातील मोठ्या लोकवस्तीला असुविधांशी सामना करावा लागतो आहे. 
उपनगरांमध्ये पावसाळ्यात असुविधा वाढतात. त्यामध्ये रस्त्यांची, पाणी साचून राहण्याची, त्याच्या निचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनतो आहे. त्यामुळे पावसाळ्यात उपनगरांमध्ये असुविधांचा डोंगरच दिसतो. शहरात असूनही त्यांना अनेक सुविधा मिळत नसल्याने त्या भागातील लोक संतप्त आहेत. त्याचा विचार शासनस्तरावर होताना दिसत नाही. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या लोकवस्तीतही त्या असुविधा दिसत आहेत. त्या भागातील लोकांच्या त्या असुविधांकडे लक्ष देवून त्या गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे. स्त्यावर साचून राहणाऱ्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ओढे वाहत असल्याने गटारेही तुंबली आहेत. पाणी साचून राहण्याच्या प्रकाराचा त्या भागातील नागरिकांना त्रास होतो आहे. पाणी निचऱ्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याने त्यांचे जीणेच मागास झाले आहे. 
पाणी निचरा न होणे, रस्त्यावर खड्डेच खड्डे होणे, साचून राहणारे पाणी निचरा होवून घरात शिरणे अशा अनेक गोष्टींशी सूर्यवंशी मळा, बारा डबरी परिसरातील नागरिकांना सामना करावा लागतो आहे. बारा डबरी परिसरात कचरा डंपिंग होतो. पाऊस झाल्याने पसरणारी दुर्गंधी हा वेगळाच विषय आहे. त्या भागात कचरा डेपोतूनही पाणी निचरा होत नाही. ते पाणी जमिनीत साचते. ते साचलेले पाणी लोकांच्या घरात उमाळा येऊन पसरताना दिसते आहे. 

...अशी आहे स्थिती 
 पाणी निचरा होत नसल्याने खड्ड्यांचे पाणी घरातही शिरते 
 अनेक कॉलन्यांतून साचून राहणाऱ्या पाण्यामुळेही रस्ते होताहेत खराब 
 पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज 
 कचरा डेपोतून पाणी जमिनीत मुरल्याने अनेक घरांत त्याचा उमाळा 
 डांबरी रस्ते नसल्याने कच्च्या रस्त्यावर वाहनधारकांची होतेय कसरत 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com