प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणी 

संतोष सिरसट 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राज्याच्या शिक्षण विभागाने मागील दोन-तीन वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या अध्यापनामध्ये प्रगती व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे.

सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायन निश्‍चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षापासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. 

राज्याच्या शिक्षण विभागाने मागील दोन-तीन वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या अध्यापनामध्ये प्रगती व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे. या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात देशामध्ये आपल्या राज्याचा पहिला क्रमांक यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवली आहे. त्यानुषंगाने राज्यभर पायाभूत चाचणीचा कार्यक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांची किती शैक्षणिक प्रगती झाली आहे, कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये तो कमी पडतो हे निश्‍चित करणे हा या चाचणीचा उद्देश आहे. 

शिक्षकांनी अतिरिक्त मदत करु नये -
विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळावेत या हेतूने शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना चाचणीपूर्वी किंवा चाचणीच्या वेळी अतिरिक्त मदत करू नये. अशाप्रकारची मदत केल्यास तो विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्ती मध्ये कच्चा आहे, हे लक्षात येणार नाही. 
 
पायाभूत चाचणीचे वेळापत्रक -
28 ऑगस्ट : दुसरी ते आठवी-मराठी-सकाळी 11 ते 1  
29 ऑगस्ट : दुसरी ते आठवी-गणित-सकाळी 11 ते 1
30 ऑगस्ट : तिसरी ते आठवी-इंग्रजी-सकाळी 11 ते 1
31 ऑगस्ट : सहावी ते आठवी-विज्ञान-11 ते 1 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Basic testing under Advanced Education Maharashtra program