ही परिवर्तनाची लढाई; जनतेने साथ द्यावी- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

गेली साडेचार वर्षे सत्ता हातात असताना मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणुक आल्यावर रामाची आठवण झाली आहे. साडे चार वर्षे त्यांनी रामाच्या हिताची जपणूक केली नाही. विकासाच्या दृष्टीने जे स्वप्न दाखविले, त्यातून काहीही झालेले नाही. त्यामुळे जनता आपल्यापासून दूर जातेय हे पाहून त्यांनी आता रामाच्या नावाचा जप सुरू केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदी व भाजप सरकारवर केली.

सातारा : ही परिवर्तनाची लढाई आहे, यामध्ये जनतेने साथ द्यायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेली साडेचार वर्षे सत्ता हातात असताना मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणुक आल्यावर रामाची आठवण झाली आहे. साडे चार वर्षे त्यांनी रामाच्या हिताची जपणूक केली नाही. विकासाच्या दृष्टीने जे स्वप्न दाखविले, त्यातून काहीही झालेले नाही. त्यामुळे जनता आपल्यापासून दूर जातेय हे पाहून त्यांनी आता रामाच्या नावाचा जप सुरू केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदी व भाजप सरकारवर केली. 

पाटणचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विक्रमसिंह पाटण यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, भास्करराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सत्यजितसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शरद पवार म्हणाले, "आज देशाचे राजकारण बदलले आहे. साडेचार वर्षापूर्वी विकासाच्या नावाखाली वेगळे वातावरण निर्माण केले. लोकांना वाटले काहीतरी भयंकर करून दाखविणार आहेत, आपण त्यांना संधी द्यावी आणि लोकांनी संधी दिली. मुठभर हिताची जपणूक करणारे आणि धार्मिक, जातीयवादाचा पुरस्कार करणारे राज्यकर्ते आज देशात राज्य करतात. हे आता देशातील जनतेच्या लक्षात आले आहे. राम मंदीराच्या नावाखाली गेली दहा वर्षे राजकारण केले आहे. अटलबिहारी पंतप्रधान असताना सत्ता हातात होती. गेली साडेचार वर्षे मोदींना सत्ता हातात असताना कधी त्यांना रामाची आठवण झाली नाही. पण निवडणुक आल्यावर रामाची आठवण झाली आहे." 

गेली साडेचार वर्षे त्यांनी रामाच्या हिताची जपणूक केली नाही. जनतेला विकासाच्या दृष्टीने स्वप्न दाखविले, त्यातून काहीही झालेले नाही. त्यामुळे जनता आपल्यापासून दूर जातेय हे पाहून त्यांनी आता रामाच्या नावाचा जप सुरू केला आहे, अशी टीका पवार यांनी केली. 

Web Title: This is the Battle of Transformation Sharad Pawar should give support to the people