सावधान ! अजून डेंगी तळ ठोकून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सांगली - अजून डेंगी शहरात तळ ठोकून आहे. महापालिका यंत्रणा, सिव्हिल इस्पितळ यंत्रणेकडे डेंगी रुग्णांची नोंद अजूनही होत आहे. खासगी रुग्णालयांत डेंगीच्या रुग्णांचे अधिक प्रमाण आहे जे शासन यंत्रणेच्या नोंदीवर येत नाही. 

सिव्हिलमधील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भागवत म्हणाले, ‘डेंगीचे रुग्ण शहरात अजूनही आढळताहेत. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रमाण घटले आहे. गेल्या आठवड्यात चार रुग्ण होते. सध्या एकच रुग्ण उपचार घेत आहे. डेंगीच्या डासांची उत्पत्ती रोखणे आणि घरांमध्ये पुरेसी दक्षता घेणे, हेच उपाय आहेत.‘‘ 

डॉ. अभिजित जोशी म्हणाले, ‘महिन्यात 13 हून अधिक डेंगी रुग्ण इस्पितळात दाखल होते. आता हे प्रमाण कमी होत आहे. मात्र अजूनही रुग्ण दाखल होत आहेत. धोका टळलेला नाही.‘‘ 

डेंगीचे रुग्ण आढळत असल्याचे मान्य करून आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे म्हणाले, ‘पालिका यंत्रणेने तापाच्या रुग्णांची शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. त्यांच्या घरातील डासांचे नमुने घेणे, उत्पत्तीस्थळांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करणे, ही कामे आमच्याकडून सुरू आहेत. एसटी स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता तसेच पाण्याचा निचरा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. डेंगीचे डास होणार नाहीत याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. नागरिकांवर कारवाईच्या पालिका यंत्रणेला मर्यादा आहेत.‘‘ 

मुंबईत कारवाई, सांगलीत का नाही 
मुंबई महापालिकेने डेंगी हिवतापाच्या प्रसारास कारणीभूत ठरल्याबद्दल यंदा 13 हजार नागरिकांना नोटिसा दिल्या. 927 जणांवर खटलेही दाखल केले. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कलम 381 अन्वये नोटीस बजावून तीन दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत नागरिकांनी कार्यवाही न केल्यास कलम 381 ब अन्वये खटला दाखल केला जातो. डास शोधकांना कामात असहकार्य करणाऱ्या व घरात प्रवेश नाकारणाऱ्यांवरही कारवाई होते. सांगली महापालिकेने अशी काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.

Web Title: Be careful! from Dengue