मराठी संगीत नाटकाचं संग्रहालय व्हावे 

Be a museum of Marathi music drama- subodh bhave
Be a museum of Marathi music drama- subodh bhave

सांगली ः मराठी नाट्यपरंपरेतील एक पान असलेल्या मराठी संगीत नाटकाचे संग्रहालय सांगलीत व्हावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करु अशी ग्वाही शिवसेनेच्या चित्रपट विभागाचे उपाध्यक्ष व अभिनेते सुबोध भावे यांनी दिली. आज त्यांनी सकाळ कार्यालयास भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगली माझं दुसरं घरच असून सांगलीचं गावपण अजूनही कायम आहे याचे खूप समाधान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सांगलीत "अश्रूची झाली फुले' या नाट्यप्रयोगासाठी आलेल्या श्री भावे यांनी "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सांगलीशी आपला स्नेह अधोरेखित केला. ते म्हणाले,"" मुंबईत चित्रपट संग्रहालयाप्रमाणेच मराठी नाटकाचेही संग्रहालय व्हायला हवे. त्यात संगीत नाटकाच्या संहिता, रेकॉर्ड, संगीत नाटकाचा इतिहास असं सारं काही असावं. ज्याचा अभ्यासकांना कलावंताना उपयोग होईल. इथल्या नाट्यसंस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यासाठी मी शासन दरबारी नक्की प्रयत्न करेन. ते सांगलीतच झाले तर अधिक आनंदच होईल. याबाबत मी जरुर मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करेन.

सांगलीशी माझे दुसरे घर आहे. "कट्यार'पासूनचा माझा स्नेह वाढतच गेला आहे. इथे नाटक-संगीताची सकस परंपरा आहे. इथं रहावं असंच शहर आहे. '' ते म्हणाले,"" मराठी माणसाचं नाटकाशी असलेले नातं इतक एकजीव आहे की ते रक्तातच आहे. त्यामुळे कोणा सेलेब्रिटी कलावंतामुळे नव्हे तर मराठी माणसांच्या आवडीपोटीच नाटक जीवंत आहे. मात्र नाट्यक्षेत्राला बुस्ट देण्यासाठी शासनाकडूनही नाट्यनिर्मात्यांच्या अपेक्षा आहेत. मराठी नाटक छोट्या शहरा-गावांपर्यंत नेण्यासाठी नाट्यसंस्थाच्या वाहनांना टोलमाफी, शहराच्या ठिकाणी असलेली शासकीय विश्रामगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आधी कलावंत आहेत. त्यांनी मराठी कलावंताना नेहमीच स्नेह दिला आहे. नाट्यक्षेत्राच्या मागण्यांबाबत ते नक्की सकारात्मक भूमिका घेतील. मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com