अबब... अस्वलाने भरवस्तीतून पळवली मधपोळी...

 bear escaped the honeycomb
bear escaped the honeycomb

बेळगाव (खानापूर) - अस्वलाने लोकवस्तीत प्रवेश करून मधुमक्षिकापालनांतर्गत पेट्यांमध्ये विकसित केलेली मधाची पोळी पळविली. कालमणीतील (ता. खानापूर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर गल्लीत ही घटना घडली. मधासाठी अस्वलाने थेट लोकवस्तीतच प्रवेश केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. घटनेची माहिती वनखात्याला देण्यात आली असून दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे.

अस्वलाने मधपोळी असा मारला डल्ला

  कालमणीतील राजाभाऊ मादार आणि रमेश मादार मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांनी परसबागेत मधपेट्या ठेवल्या आहेत. रविवारी रात्री अस्वलाने या पेट्यांचे नुकसान करून त्यातील मधाची पोळी लांबवली. गावाच्या बाजूलाच जंगल असल्याने अस्वलांनी मधाच्या आशेने सहजपणे गावात प्रवेश करून पोळ्यांवर डल्ला मारला. त्यामुळे, उभयतांना आर्थिक फटका बसला असला तरी लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. रात्रीच्यावेळी अस्वल राजरोसपणे लोकवस्तीत येत असल्याचे सिद्ध झाल्याने गावभर दहशत माजली आहे.

ग्रामस्थांत घबराट

अस्वल हा सर्वात धोकादायक प्राणी असल्याने त्याचा वावर गंभीर बनला आहे. अस्वल मधासाठी पुन्हा गावात येण्याची शक्‍यता असल्यामुळे लोकांना रात्री घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. याबाबत वनखात्याला कळविण्यात आले आहे. धोका लक्षात घेऊन वनखात्याने अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांची दहशत वाढली असतानाच माकडांनी कालमणीवासियांचे जगणे मुश्‍किल करुन सोडले आहे. परसबागेतील फळबागांमध्ये त्यांनी उच्छांद मांडला आहे. शिवाय घरामधील वस्तूंचे नुकसान केले जात असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

रात्रीच्यावेळी अचानक अस्वलाने परसबागेतील मधाच्या पेट्यांचे नुकसान करून त्यातील पोळी पळविली. नुकसान तर झाले आहेच; पण अस्वल गावात येत असल्याने भीती निर्माण झाली आहे. कुणीही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्यास धजत नाही. वनखात्याने अस्वलाचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.
- राजाभाऊ मादार, मध उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com