दर्जा तपासणाऱ्यांना मारहाण 

Beated the quality checkers
Beated the quality checkers

श्रीगोंदे : नगर-दौंड महामार्गाचे काम करणाऱ्या दिनेशचंद्र अग्रवाल या कंपनीच्या पाच परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला काल (बुधवारी) लोखंडी रॉड व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. त्यात सुनीत वाबळे (कोळगाव) जखमी झाले. 

हे आहेत आरोपी 
वाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुल मोहमद अन्सारी (रा. गोधा सिटी), मोहम्मद इमामोद्दीन (रा. छापरा, बिहार), मिश्रा (पूर्ण नाव समजले नाही), संतोषकुमार पटेल आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कामाची पाहणी करण्यासाठी गेले

वाबळे हायवे इंजिनिअर अँड कन्सल्टंट असोसिएट वुईथ क्रिएशन इंजिनिअरिंग या कंपनीत काम करतात. या कंपनीचा रस्तेविकास महामंडळाशी करार आहे. ही कंपनी दिनेशचंद्र अग्रवाल यांच्याकरवी सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता तपासण्याचे काम करते. काल दुपारी साडेबारा वाजता वाबळे त्यांचे सहकारी महेंद्र तळपाडे, संतोष नागर, तसेच चालक रमाकांत निशाद यांच्यासह नगर-दौंड रस्त्यावर निमगाव खलू येथील भीमा नदीवर अग्रवाल कंपनीतर्फे सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. 

लोखंडी रॉडने मारहाण 
त्या वेळी ही मारहाण करण्यात आली. नंतर वाबळे व त्यांचे सहकारी जेवणासाठी सांगवी दुमाला शिवारात अग्रवाल कंपनीच्या डेपोमध्ये गेले. तेथेही पाठीमागून आलेल्या पाच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढविला. लोखंडी रॉड व लाथाबुक्‍क्‍यांनी त्यांना मारहाण केली. वाबळे यांना काष्टी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com