फळबाग जगवण्यासाठी करावी लागतेय विहिरीची खोदाई

फळबाग जगवण्यासाठी करावी लागतेय विहिरीची खोदाई

पोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी होत आहेत. परंतु अशाही स्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोथरे व परिसरातील फळबागा जगविण्यासाठी शेतकरी आहे त्या विहिरी खोल करत आहेत तर काही नव्याने विहीरी घेऊन पाणी अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अनेक ठिकाणी पाणी लागत नाही व लागलेले पाणी टिकत नसल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. 

करमाळा तालुक्यात पूर्व व उत्तर भागात शेतकऱ्यांनी उसाला पर्याय म्हणून लिंबोनी, दाळिंब, चिंकू, सीताफळ या सारख्या फळबागा मोठ्या प्रमाणात लावल्या आहेत. परंतु दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचे सर्व स्तोत्र बंद पडल्याने फळबागा जगविणे कठीण झाले आहे सध्या 58 रुपये फुटाणे बोअरवेल घेत असून तो तीनशे ते साडेतीनशे फूट घ्यावा लागत असून पाईप सह एका बोरला 25 ते 30 हजार रुपये खर्च येत आहे. तर विहीर खोदण्यासाठी एका परसाला (सातफूट) 60 ते 70 हजार रुपये खर्च येत आहे. एवढा खर्च करूनही पाणी लागेल याची शाश्वती नाही. व लागलेले पाणी टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. अशा स्थितीतही शेतकरी मात्र फळबाग जगवण्यासाठी कर्ज काढून पाण्यासाठी धडपड करत आहे.

'माझ्याकडे पाच एकर लिंबोनिचे फळबाग आहे मी तीन बोअरवेल घेतले परंतु पाणी लागले नाही. फळबाग टिकली नाही तर मोठे नुकसान होणार आहे. '
- हरिश्चंद्र झिंजाडे, शेतकरी

'गेल्या पंधरा दिवसांपासून मी फळबागेला टँकरने पाणी घालत आहे. घरचा टँकर असूनही एका खेपाला दीड हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च न परवडणारा आहे.' 
- ईश्वर पाटील, शेतकरी पोथरे

गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी अनेक शेतकरी नव्या व जुन्या विहीरीची खोदाई करत आहेत. सध्या किरणाला एका दिवसासाठी एक हजार रुपये रोज मिळत आहे.' - 
रविन्द्र झिंजाडे, क्रेन व्यावसायिक

'फळबाग जगवण्यासाठी जमिनीवर पाचटाचे आच्छादन करावे. त्यामुळे होणारे बाष्पीभवन थांबून जमिनीत ओलावा टिकून राहील शिवाय पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करावा.
- सुहास पोळके कृषी पर्यवेक्षक करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com