खबरींमुळे सातारा पाेलिस पाेहचले 'यांच्या' पर्यंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

अवघ्या काही तासांत केलेल्या कामगिरीमुळे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी पथकाचे अभिनंदन केले.

सातारा : शहापूर (ता.जि.सातारा) गावी गोवा गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती सातारा तालुका पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना खबरींच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी त्यांचकडील डी.बी. पथकातील राजू मुलाणी, दादा परिहार, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांना याबाबत माहिती घेवून कारवाई करण्याची सूचना केली.

या पथकातील पोलीस कर्मचारी यांनी मिळाले माहितीप्रमाणे शहापूर भागामध्ये याठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना टेम्पो क्रमांक. एम.एच.११ ए.एल.३६५३ यास थांबवून त्याचे हौदयामध्ये तपासणी केली. त्यामध्ये गोवा गुटखाचे पांढरे रंगाचे एकूण १४ पोती मिळून आली. वाहनचालक राहूल वामन माने (वय २९, राहणार. शहापूर ता.जि. सातारा) याने माल विक्रीसाठी आणलेला असल्याचे माहिती पाेलिसांनी दिली.

त्यानंतर पाेलिसांनी गुटखाचा माल, टेम्पो, आरोपी ताब्यात घेतले. हा गुटखा 20 लाख 28 हजार सहाशे रुपये किंमतीचा आहे. तसेच जप्त केलेल्या टेम्पोची किंमत पाच लाख रूपयांचा आहे. या गुन्ह्यात एकूण २५ लाख २८ हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 ग्रामस्थांनी आजाेबांसह नातींना वाचविले....पण

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अनिल अरूणराव पवार यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा देसाई करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Because of the Messenger Satara Police Reached 'To' Them