'सकाळ'मुळे जयहिंद फूड बँकेला मिळाले चारचाकी वाहन !

परशुराम कोकणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

आजवर आमचे सदस्य दुचाकीवर फिरून हे अन्नदानाचे काम करायचे. "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अनेकजण मदतीसाठी पुढे आले. सुहाना मसाले यांच्याकडून फूड बॅंकेसाठी चारचाकी वाहन देण्यात आले आहे. वाहनामुळे फूड बॅंकेच्या कामाला अधिक गती मिळेल. 

- सतीश तमशेट्टी, संस्थापक, जयहिंद फुडबॅंक

सोलापूर : विविध कार्यक्रमांमध्ये राहिलेले अन्न घेऊन ते गरजूंपर्यंत पोचविण्याचे काम निःस्वार्थीपणे करणाऱ्या जयहिंद फुडबॅंकेला "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मदत मिळाली आहे. प्रवीण मसालेवाले पुणे यांच्यावतीने बुधवारी जय हिंद फूड बॅंकेला अन्नाची ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहन देण्यात आले. 

जय हिंद फूड बॅंकेचा उपक्रम 15 ऑगस्ट 2013 ला सुरू झाला. आजवर विविध कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अन्न घेऊन हजारो गरजू लोकांपर्यंत पोचवले आहे. कोणत्याही कार्यक्रमात अन्न शिल्लक राहिले तर लोक जय हिंद फूड बॅंकेला 9665808571 या मोबाईल क्रमांकावर फोन करून कळवितात. फुडबॅंकेचे सदस्य तिथे जाऊन जेवण घेऊन गरजूंपर्यंत पोहोचवतात. जेवण घेण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केला जायचा, कॅरीबॅगवर बंदी आल्याने पर्याय म्हणून स्टीलचे डब्बे आणि टाकीचा वापर करण्यात येत आहे. आता फुडबॅंकेला वाहन मिळाल्याने दहा हत्तीचे बळ आल्याची भावना संस्थापक सतीश तमशेट्टी यांनी व्यक्त केली. 

बुधवारी हुतात्मा पुतळा परिसरात प्रवीण मसालेवालेच्या अधिकाऱ्यांकडून जय हिंद फूड बॅंकेला चारचाकी वाहन देण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे, सुहाना मसालाचे एरिया सेल्स मॅनेजर संजय देशमुख, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे, सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक प्रा. नरेंद्र काटीकर, प्रा.राजशेखर चौधरी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. 

जय हिंद फूड बॅंकेची चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी संस्थापक सतीश तमशेट्टी यांच्यासह प्रा.विक्रम बायस, रणजित शेळके, हणमंतु श्रीराम, सुरेश सिरसिल्ला, सुधीर तमशेट्टी, अनिकेत सरवदे, विनय गांगजी, मृदुला मोहोळकर, मनाली म्हेत्रे, गजानन यन्नम, राज कोरे, कपिल क्षीरसागर, संदीप सरवदे, सागर जवळकर, रोहित गदगे, मयूर मणुरे, तुकाराम बुलबुले, अंकुश चौगुले, हिरा बंदपट्टे, रोहित बिराजदार, नितीन लिंबोळे, प्रथमेश रापोल, प्रीतम भस्मे, अविनाश हंचाटे, शिवाई शेळके, रवी गोणे, प्रकाश असादे, राहुल तमशेट्टी, अलोक तंबाके, संतोष राठोड, सारिका तमशेट्टी-गिडवीर आदी उपस्थित होते. 

Web Title: because of Sakal got four wheeler