दूषित पाणी पिल्याने वस्ती साकुर्डी येथील 100 जणांना गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

दूषित पाणी पिल्याने वस्ती साकुर्डी येथील सुमारे १०० जणांना गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण झाली. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली असून अनेकांवर उपजिल्हा रुग्णालय, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कऱ्हाड : दूषित पाणी पिल्याने वस्ती साकुर्डी येथील सुमारे १०० जणांना गॅस्ट्रोसदृश्य साथीची लागण झाली. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली असून अनेकांवर उपजिल्हा रुग्णालय, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यातील पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारांसाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावांमध्ये दाखल झाले असून त्यांच्यामार्फत रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. साकुर्डी येथे कालपासून ग्रामस्थांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. संबंधित ग्रामस्थ गावातीलच एका लग्नासाठी जाऊन आल्यानंतर त्यांना हा त्रास सुरु झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत सुमारे 50 हून अधिक जणांची त्यामध्ये भर पडली. त्यामुळे त्याची तीव्रता वाढल्याने गावांमध्ये खळबळ उडाली आहे. दुपारपर्यंत ती संख्या शंभरावर गेली आहे. 

संबंधितांवर उपजिल्हा रुग्णालय, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यातील पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावामध्ये दाखल झाले असून त्यांच्यामार्फत गावातील ग्रामपंचायत कार्यालय व मंदिरात सलाईन लावून उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

Web Title: Because of water 100 Peoples Suffering Like Gastro in Sakurdi