बेडगमध्ये रहिवाशांनी श्रमदानातून केला दोन किलोमीटरचा रस्ता

निरजंन सुतार
Thursday, 24 September 2020

बेडग ( ता.मिरज ) येथील मंगसुळी रस्ता ते शिंदे वस्ती या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम महिलांनी श्रमदान व लोकवर्गणीतून पूर्ण केले.

आरग : बेडग ( ता.मिरज ) येथील मंगसुळी रस्ता ते शिंदे वस्ती या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम महिलांनी श्रमदान व लोकवर्गणीतून पूर्ण केले. पक्का रस्ता नसल्याने वस्तीवरील सर्वांचीच गैरसोय होत होती. ग्रामपंचायतीनेही मागणीकडे सतत कानाडोळा केला. त्यामुळे महिलांनी एकत्र येत आपआपला मार्ग शोधला. 

या रस्त्याला जूना लोकूर रस्ता म्हणून ओळखले जाते. जवळपास शंभरावर कुटुंबाची त्यावरून वहिवाट असते. आत्तापर्यंत कधीही शासननिधीतून पैचा मुरुम कधी पडलेला नाही. पावसाळ्याच्या या रस्त्याची बिकट स्थिती असते. ऊस, द्राक्षे व इतर शेतमालांची वाहतूक अवघड असते. वाहने चिखलात अडकतात. शेवटी या रस्त्यासाठीवस्तीवरील रहिवाशी अबालवृध्दांनी पुढाकार घेत मुरमीकरण केले. यापुढे मतदान मागायला येणाऱ्यांना जाब विचारु असा निर्धारही त्यांनी केला आहे. शिंदे, नलवडे, कणसे ,आवटी ,उदगावे, पवार, गायकवाड कुटुंबातील सर्व पुरूष-महिलांनी श्रमदान करीत रस्ता पुर्ण केला. 

सध्या निधीबाबत स्थिती वाईट आहे. शासनाने निधी परत मागवल्याने अडचण झाली आहे. तथापि हा रस्ता अधिक पक्का करण्यासाठी मासिक बैठकीत चर्चा करून काही ना काही पर्याय काढु. '' 
सौ. रुपाली शिंदे, सरपंच  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Bedug, the residents worked hard for a two-kilometer road