दुचाकीच्या धडकेत बेळगावात महिला ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

बसच्या समोरून कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना खानापूरकडून बेळगावकडे निघालेल्या दुचाकीस्वार युवकाला अचानक बससमोरून आलेल्या महिलेचा अंदाज आला नाही. त्यामुळे अरियन यांना जोराची धडक बसली. रस्त्यावर कोसळलेल्या अरियन यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या

बेळगाव - रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. अरियन पावलू परेरा (50, रा. हुंचेनट्टी रोड मच्छे) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी पावणे आठच्या सुमारास उद्यमबागमधील बस थांब्याजवळ हा अपघात घडला. 

याबाबत वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मच्छे येथील अरियन या उद्यमबागमधील एका कारखान्यात काम करतात. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे बसमधून उद्यमबागमधील बस थांब्याजवळ येऊन उतरल्या. बसच्या समोरून कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना खानापूरकडून बेळगावकडे निघालेल्या दुचाकीस्वार युवकाला अचानक बससमोरून आलेल्या महिलेचा अंदाज आला नाही. त्यामुळे अरियन यांना जोराची धडक बसली. रस्त्यावर कोसळलेल्या अरियन यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या.

वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तिम्माप्पा करीकल यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या शवागरात पाठविण्यात आला. या प्रकरणी रोहीत नामक युवकाला दुचाकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निरीक्षक करीकल अधिक तपास करीत आहेत.

Web Title: belgaon news: accident