Belgaum : भाजपच्या आमदारांना उमेदवारी देऊ केल्याच्या आरोपावर पलटवार ;शिवकुमार Belgaum BJP Shivkumar offering candidature Accusing the ruling | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. के. शिवकुमार

Belgaum : भाजपच्या आमदारांना उमेदवारी देऊ केल्याच्या आरोपावर पलटवार ;शिवकुमार

बंगळूर : कर्नाटकातील १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांना फोन करून त्यांना तिकीट देऊ केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर पलटवार करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी बोम्मई यांच्याकडे नैतिकता नाही, असा पलटवार केला. ते पक्षांतरित काँग्रेस-धजद आमदारांच्या पाठिंब्याने ‘युती सरकार’ चालवत अशी टीकाही आहेत.

सत्ताधारी भाजपवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा आरोप करत ते म्हणाले, ‘गोमूत्र आणि शेण हे शुभ मानले जाते आणि धार्मिक समारंभात शुद्धीकरणासाठी वापरले जाते. ते देखील आपल्या सरकारचे दुष्कृत्य पुसून टाकू शकले नाही. मुख्यमंत्री म्हणत आहेत की, मी भाजपच्या आमदारांशी संपर्क साधत आहे. तुम्ही आमच्या (काँग्रेस) पैकी १३ आमदारांचे, धजदचे तीन आणि दोन अपक्षांचे दरवाजे ठोठावून त्यांना सोबत घेतले नाही का? तुमच्यात कोणती नैतिकता आहे?’

येथे पत्रकारांशी बोलताना ते बोम्मई म्हणाले की, ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या आमदारांना ओढून घेऊन तुम्ही इतके दिवस सत्ता उपभोगली. लोकांनी तुम्हाला बहुमत दिले नसतानाही अनैतिक सरकार बनवले. तुम्ही आजपर्यंत अपक्ष, धजद, काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याने आघाडीचे सरकार चालवले आहे. शिवकुमार दोन-तीन दिवसांपासून आमच्या आमदारांना फोन करत आहेत. ज्या १०० मतदारसंघात त्यांनी अद्याप उमेदवारी जाहीर

केलेली नाही.