Belgaum : जमावबंदीआदेशात 2 दिवसांनी वाढ; खानापुर, मांजरीत बंदला प्रतिसाद

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने बेळगाव तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Belgaum Curfew
Belgaum CurfewSakal
Summary

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने बेळगाव तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगाव - बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची (Statue) विटंबना केल्याने बेळगाव तणावाचे (Tension) वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कन्नड संघटनांनी देखील थयथयाट सुरू केला असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसानी कलम १४४ नुसार जमावबंदीचा (Curfew) आदेशात दोन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवार (ता. २२) सकाळी ६ पर्यंत जमा बंदी कायम राहणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी सोमवार (ता. २०) सकाळी ६ पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला होता. मात्र जमावबंदीचा आदेश पायदळी तुडवत आज कन्नड संघटनांनी आगळीक करत पिरनवाडी संगोळी रायन्ना पुतळ्यानजिक मोठ्या संख्येने जमून महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडून नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी जमाबंदीमध्ये वाढ करत बुधवारन(ता.२२) सकाळी सहा पर्यंत जमाबंदी वाढविली आहे. त्यामुळे या काळात कोणालाही मोठ्या संख्येने एकत्रित येता येणार नाही.

खानापुरात १०० टक्के बंदला प्रतीसाद

खानापुरातील विविध संघटनांनी बंदची हाक दिली होती.सकाळी 11 वाजता शहरातील लक्ष्मी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढून विटंबना करणाऱ्या विरोधात तसेच कर्नाटक शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या प्रतिमा हाती घेऊन समतेचा नारा दिला. तसेच देशातील कोणाही महापुरूषाच्या बाबतीत असा प्रकार घडू नये, या संदर्भातले निवेदन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना सादर करण्यात आले. यावेळी पंडित ओगले, माजी आ. अरविंद पाटील, विठ्ठल हलगेकर, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, किरण पाटील, विनायक सावंत ,प्रतीक देसाई आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. खानापुरचा आठवडी बाजार रविवारचा असल्याने यावेळी बाजार भरू शकला नाही. व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा देऊन सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे नेहमी गजबजनाऱ्या स्टेशन रोडवर स्मशान शांतता पसरली होती.

Belgaum Curfew
Belguam: शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी 7 जणांना अटक, 27 जणांवर कारवाई

पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ मांजरी येथे बंदला प्रतिसाद

मांजरीत सर्व समाज बांधवांकडून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठींबा दिला. प्रमुख नेत्यांनी मूक मोर्चा काढून पुतळा विटंबनेच्या घटनेचा निषेधार्थ निषेध नोंदविला. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडल पोलिस निरीक्षक तुकाराम निलगार यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

येथील नूतन बसस्थानकापासून मूक निषेध मोर्चाला प्रारंभ केला. सदर निषेध मोर्चा गावातील प्रमुख मार्गावर काढून छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळासमोर सभा झाली. मराठा समाजाचे नेते, प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब यादव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा ही व्यक्तिमत्त्वे जगासाठी आदर्शवत आहेत. राष्ट्रपुरुषांच्या नावाचा गैरवापर करून शांतता, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. राष्ट्रकुल पुरूषांचा झालेला अपमान कदापी समाज खपवून घेणार नाही. दंडाला काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते दुग्ध अभिषेक केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com