बेळगाव जिल्ह्यातील 51853 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBSC12th exam

बेळगाव जिल्ह्यातील 51853 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

बेळगाव : विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी बारावीची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे बारावी परीक्षेची तयारी केली जात असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे.

बारावीच्या परीक्षेला २२ एप्रिलपासून सुरवात होणार असून कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी परीक्षा केंद्रांवर कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे परिक्षेच्या अगोदर केंद्रावर स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४१ तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ४८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेली २ वर्षे बारावीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते. मात्र यावेळी बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेची तयारी केली आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे २४०४६ तर चिक्कोडी शैक्षणिकमधील २७८०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून केंद्र प्रमुख व परिवेक्षक आना आवश्यकता सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे

बेळगाव शैक्षणिक जिल्हा

 • रेग्युलर - २०८१७

 • खाजगी - ४९१

 • रीपिटर्स - २७३८

 • विद्यार्थी - १२६९८

 • विद्यार्थिनी - ११३४९

 • चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा

 • रेग्युलर - २४३०८

 • खाजगी - ८४३

 • रिपीटर्स - २६५६

 • विद्यार्थी - १५६३४

 • विद्यार्थिनी - १२१७३

परीक्षा देणारे विविध शाखेचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे

बेळगाव शैक्षणिक जिल्हा

 • कला - १४४६१

 • वाणिज्य - ६९३०

 • विज्ञान - ६४१६.....

 • चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा

 • कला - १२१७३

 • वाणिज्य - १४४६१

 • विज्ञान - ६९३०

एक नजर

 • जिल्ह्यात कला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक

 • बेळगाव जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 51853

 • चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या अधिक

 • एका वर्गात 24 ते 30 विद्यार्थी परीक्षा देणार

 • सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

 • परीक्षेची सर्व तयारी पूर्ण

बारावी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून एका वर्गात २४ ते ३० विद्यार्थ्यांना बसविण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व केंद्रप्रमुख यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे परीक्षा द्यावी.

व्ही नागराज, पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी

परीक्षेला विद्यार्थ्यांनी धाडसाने सामोरे जावे ही परीक्षा महत्वाची आहे. पूर्व तयारी परिक्षेनंतर वार्षिक परीक्षेचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे त्याचा परीक्षेत लाभ करून घ्यावा.

प्रा. अरविंद पाटील, ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयय

Web Title: Belgaum District Appear 12th Standard Examination Exam Preparation Completed Examination Centers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..