बेळगावात 1689 परीक्षार्थींची टीईटीला दांडी

मिलिंद देसाई
Sunday, 4 October 2020

रविवारी शहरातील विविध परीक्षा  केंद्रावर डीएड व बीएड झालेल्या विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेली टीईटी परीक्षा अखेर सुरळीतरित्या पार पडली असून रविवारी शहरातील विविध परीक्षा  केंद्रावर डीएड व बीएड झालेल्या विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1689 परीक्षार्थींनी पेपरला दांडी मारली असून सकाळच्या सत्रात झालेल्या पेपरसाठी शैक्षणिक जिल्हात सकाळच्या सत्रातील पेपरसाठी 3394 जणांनी अर्ज दाखल केले होते यापैकी 2673 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर 723 जण गैरहजर राहिले तसेच  दुपारच्या सत्रातील पेपरसाठी  6819 जणांनी अर्ज केले होते यापैकी 5853 परीक्षार्थीनी परीक्षा दिली तर 966 परीक्षार्थी गैरहजर राहिले 

2014 पासून शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा घेतली जात असून 2020 मध्ये शिक्षक भरती करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात डीएड व बीएड धारकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार राज्यातील लाखो परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते मात्र कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा सातत्याने पुढे  ढकलण्यात येत होती. मात्र शिक्षण खात्याने काही दिवसांपूर्वी टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते तसेच सामाजिक अंतर राखून व कोरोनाबाबत सर्व प्रकारची खबरदारी घेऊन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार रविवारी सकाळी सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीची आरोग्य तपासणी करून आत सोडले जात होते. केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

हेही वाचा- खादीची क्रेझ  : एकाच दिवसात ३ लाखांची विक्री ; महाराष्ट्र, गोव्यातूनही मागणी -

 
शहरातील सेंटपॉल्स, सेंट जोसेफ, सेंट मेरी, सेंट झेवियर्स, शर्मन स्कुल, महांतेशनगर कन्नड माध्यम शाळा, सिद्धरामेश्वर स्कुल, लिटल स्कॉलर स्कुल, भरतेश शाळा, उषाताई गोगटे शाळा, बी के मॉडेल शाळा, चिंतामणराव हायस्कुल, गजाननराव भातकांडे शाळा, जी ए शाळा, सरदार्स हायस्कुल, वनिता विद्यालय, बेननस्मिथ शाळा, महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा, महिला विद्यालय मराठी माध्यम शाळा मराठा मंडळ, सेंट्रल हायस्कुल, गोमटेश स्कुल, केएलएस, ठळकवाडी, अंजुमन शाळा या केंद्रावर परीक्षा पार पडली परीक्षा सुरळीतरित्या पार पडल्याने शिक्षण खात्यासह परीक्षार्थीनी सुटकेचा निश्वास सोडला असून टीईटीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर पास झालेल्या परीक्षार्थीना सीईटी द्यावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार शिक्षक भरती केली जाणार आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा घेण्यास अडचण निर्माण होत होती त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती मात्र रविवारी सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतरित्या पार पडली आहे. टीईटी झाल्याने शिक्षक भरतीस चालना मिळेल
अन्नाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Belgaum Education District 1689 candidate not attend for TET exam