बेळगावात नव मतदारांचा उत्साह Selfie काढूनच

मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्यात युवा मतदार मग्न
Belguam
Belguam esakal

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणूकीसाठी शनिवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. यावेळी युवा मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले तसेच यावेळी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांचा उत्साह देखील पाहण्या सारखा होता. यावेळी नव मतदारांनी विकासाबरोबरच नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत असे अशा भावना व्यक्त केल्या.

ग्राम पंचायत निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक दरवेळी निवडणूकीबाबत चर्चा ऐकावयास मिळत असते. त्यामुळे अनेकदा मतदान करण्याची संधी कधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यामुळेच 18 वर्षे पूर्ण होताच युवा पिढी मतदार यादीत नाव नोंद करण्यासाठी धडपडत असते. त्यामुळे मतदार यादीत नाव आलेल्या युवा मतदारांना पहिल्यांदा मतदान करण्याची प्रतीक्षा लागून राहिलेली असते. त्यामुळे शनिवारी लोकसभा पोट निवडणूकीवेळी नव मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. तसेच मतदान केल्यानंतर सेल्फी काढून घेण्यात युवा मतदार मग्न झाल्याचे दिसून येत होते. यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी मत मतदारांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असल्याचे दिसून आले.

लहान असल्यापासून मतदान प्रक्रियेबाबत सातत्याने ऐकत आलो होतो मात्र आज पहिल्यांदा मतदान करताना खूप चांगले वाटत असून निवडणूक येणाऱ्या उमेदवाराने मतदार संघाचा चांगल्या प्रकारे विकास करावा अशी अपेक्षा आहे

पूजा पाटील

मतदान करण्याची संधी मिळावी याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आज पहिल्यांदा मतदान करण्यासाठी जाताना थोडीशी हुरहुर होती मात्र मतदान केल्यानंतर खूप चांगले वाटले.

सुश्मिता शी आर

निवडून येणाऱ्या उमेदवाराने विकासाबरोबर मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीही कार्यरत राहिले पाहिजे यासाठी पहिल्यांदा मतदान केले आहे. यापुढेही दरवेळी मतदान करणार असून पहिल्यांदा मतदान करताना खूप आनंद मिळाला.

आरती अष्टेकर

पहिल्यांदा मतदान करताना योग्य उमेदवाराला मतदान केले असून यावेळी युवा वर्ग मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले येणाऱ्या काळातही अशाच प्रकारे युवा वर्गाने मतदानात भाग घेतला पाहिजे असे वाटते.

विशाल पाटील

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com