esakal | KYC अपडेटच्या नावाखाली BSNL कर्मचाऱ्याला गंडा; CEN ची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

KYC अपडेटच्या नावाखाली BSNL कर्मचाऱ्याला गंडा; CEN ची धडक कारवाई

KYC अपडेटच्या नावाखाली BSNL कर्मचाऱ्याला गंडा; CEN ची धडक कारवाई

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : केवायसी अपडेट (KYC update) करायचा असल्याचे सांगत निवृत्त बीएसएनएल (BSNL employee) कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल १०२ वेळा १० लाख रुपयांची रक्कम हडप करणाऱ्या दोघांना मंगळवार (२०) सायबर इकॉनॉमिक्स नारकोटिक्स (सीइएन) (SEN) पोलिसांनी (police) अटक केली आहे. अटकेतील पहिला मुख्य संशयित झारखंड तर दुसरा संशयित नाशिक येथील आहे. त्यांच्याकडून सुमारे १२ लाख ५६ हजार रुपयांच्या रकमेसह साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सीईएन पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. BSNL माजी कर्मचारी यल्लप्पा नारायण जाधव (रा. मारुती गल्ली कंग्राळी खुर्द) यांना ९ जून २०२१ फोन आला होता. आपल्या एसबीआय बँक (SBI bank) खात्यातील केवायसी अपडेट करायचा आहे, असे सांगून त्यांच्याकडे आधार कार्ड नंबर आणि आधार (aadhar card) कार्डची झेरॉक्स प्रत व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत व्हाट्सअपच्या माध्यमातून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आला. सदर लिंक वर क्लिक करण्यात आल्यानंतर एक ओटीपी नंबर संशयितानी यल्लप्पा यांना पाठवला. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १०२ वेळा तब्बल १० लाख रुपयांची रक्कम परस्पर हडप करण्यात आली. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी १० जून रोजी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

हेही वाचा: हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता वाचवायला

या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपासासाठी एका विशेष पोलिस पथकाची स्थापना स्थापना केली. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या प्रमुख आरोपीला झारखंड राज्यातील जमतारा जिल्हा येथून अटक केली. तर बनावट बँक खाते तयार करणाऱ्या आणखी एका मुख्य आरोपीला नाशिक येथून अटक करण्यात आली.

मंगळवारी (१५) रोजी ही कारवाई करून त्यांच्याकडून ऑनलाइन फसवणूकीसाठी वापरण्यात आलेले ५ मोबाइल संच, ३ डेबिट कार्ड, ५० वेगवेळ्या बँक खात्यातून हडप करण्यात आलेले एकूण १२ लाख ५६ हजार रुपयांची रोकड यावेळी जप्त करण्यात आली. एकुण ४८ मोबाईल, ३०४ सिमकार्ड, त्यांनी पैसे हडप करण्यासाठी ५० वेगवेगळ्या बँक खात्याचा उपयोग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. संशयितानी बेळगाव, गुलबर्गा, बंगळूर, कर्नाटक राज्यातील विविध भागात त्याच बरोबर हैदराबाद मधील विविध राज्यामध्ये ऑनलाइन गुन्हे केल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा: गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश; पाच अटकेत,राणीचा शोध सुरू

loading image