esakal | बेळगावात महाविद्यालयातील 6 तर राज्यातील 57 जणांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum new 6 corona patient found

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय महागात पडण्याची शक्यता

बेळगावात महाविद्यालयातील 6 तर राज्यातील 57 जणांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याला महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविद्यालयात दाखल होण्यापूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीवेळी शहरातील 6 तर राज्यातील 57 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून पदवी व डिप्लोमा महाविद्यालये सुरू झाली आहेत.  विद्यार्थी व प्राध्यापकांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागत आहे. मात्र चाचणी करून घेते वेळी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत असून 
शहरातील विविध महाविद्यालयात  2027 प्राध्यापक व कर्मचारी आहेत. यापैकी शहरातील 3 महाविद्यालयातील 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर राज्यातील 57 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अजून काही दिवस महाविद्यालयांच्या आवारात शुकशुकाट दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविद्यालयात दाखल होण्यापूर्वी शहरांतील विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय तर तालुक्यातील विद्यार्थी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करून घेत आहेत. 

हेही वाचा- भाजप नेत्यांना पडला विसर; बेळगाव जिल्हा विभाजनाचे काय ?


कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालये कधी पासून सुरू होणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून राहिली  होती. मात्र कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळत महाविद्यालये सुरू करावी लागत आहेत. तसेच विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीचे पत्र सादर करावे लागणार आहे. मात्र अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने पालक विद्यार्थ्यांना  सहमती पत्र देणार का असा प्रश्न उपस्थित होत असून प्राध्यापक व विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी अहवाल विद्यालयात सादर करावा लागणार असून निगेटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तरच प्रवेश मिळणार आहे त्यामुळे चाचणी करून घ्यावी लागत असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

तसेच विद्यालयात येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत 
सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात येणार असून मास्क वापरावा व गर्दी करू नये अशी सूचनाही शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे अजूनही महाविद्यालयात गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यालये सुरू झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या काळात शाळा सुरू करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

संपादन- अर्चना बनगे
 

loading image
go to top