येल्लापूरनजीक अपघातात बेळगाव जिल्ह्यातील 9 ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कारवार जिल्ह्यातील यल्लारपूरनजीक आरेबैल गावाजवळ झालेल्या अपघातात बेळगाव जिल्ह्यातील नऊजण ठार झाले आहेत.

बेळगाव - कारवार जिल्ह्यातील यल्लारपूरनजीक आरेबैल गावाजवळ झालेल्या अपघातात बेळगाव जिल्ह्यातील नऊजण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला, तीन लहान मुलांसह 9 जणांचा समावेश आहे. तसेच या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

हे सर्वजण मोटारीने दक्षिण कर्नाटकात प्रवासासाठी गेले होते. तेथून परत येत असताना ट्रक व मोटारीचा अपघात झाला. त्यात नऊजण ठार झाले. मृतांची नावे अशी -  विवेक वसंत घाटगे (वय 35) , मेनका विवेक घाटगे (26), वैष्णवी (5), वरदराज (1) हे सर्व रा. निडगुंदीचे तसेच विवेक मेकळी (55), रेणुका कांबळे, अभिनव कांबळे, गजानन मैत्री (खेमलापूर ता. रायबाग) व चालक मज्जू मुदाहीद इक्बाल नाईकवाडी

Web Title: belgaum news accident near yellarpur