
बेळगाव : श्वान नसबंदीसाठी एक कोटींचा खर्च
बेळगाव: नसबंदी मोहिमेसाठी शहरातील प्रत्येक कुत्र्यामागे महापालिकेला १,६५० रुपये खर्च होणार आहेत. भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून नसबंदीसाठीचे दर निश्चित केले आहेत. ५ एप्रिल रोजी याबाबतचा आदेश बजावला आहे. महापालिकेला नसबंदीसाठी ठेकेदार नियुक्त करताना वरीलप्रमाणे दर निश्चित करावे लागतील. प्राणीकल्याण मंडळाच्या आदेशानुसार नसबंदीसाठी किमान १६५० रुपये दर ठेकेदाराला देणे आवश्यक आहे. शहरातील सुमारे ६ हजार मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने नसबंदीच्या कामाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली आहे. त्यात ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे. दाखल झालेल्या निविदांची तांत्रिक पडताळणी केली आहे, पण त्यांनी नमूद केलेले दर मंजूर करावेत की नाहीत? याबाबतचा संभ्रम होता, पण नव्या दरामुळे महापालिकेचा संभ्रम दूर झाला आहे.
शहरात २००७ साली पहिल्यांदा मोकाट कुत्र्यांची नसबंदी सुरू झाली, पण कमी दरामुळेच ठेकेदारांनी प्रत्येक वेळी ही मोहीम अर्धवट ठेवली. २०१९ साली पान ९ वर
श्वान नसबंदीसाठी एक कोटींचा खर्च
कर्नाटकातील रामनगर येथील चेतक संस्थेला नसबंदीचा ठेका दिला. त्या कंपनीने मात्र निश्चित केलेल्या दरात काम केले. पण शस्त्रक्रियागृहात पुरेशा सुविधा नसल्याचे कारण देत मोहीम थांबविली. त्यानंतर अडीच वर्षांपासून ही मोहीम बंदच आहे.
महापालिकेने तातडीने या कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला व निविदाही काढली. प्राणी कल्याण मंडळाने नसबंदी नियम २००१ मधील तरतुदींचा आधार घेत नवे दर निश्चित केले आहेत. मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून राबविली जावी किंवा एखाद्या बिगर शासकीय संस्थेकडे या मोहिमेची जबाबदारी दिली जावी, असा आदेश मंडळाने दिला आहे. त्याशिवाय मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी व पकडल्यानंतर त्यांची औषधे, खाद्य, शस्त्रक्रिया व त्यानंतरची देखभाल यासाठी स्वतंत्र दर निश्चित केले आहेत.
Web Title: Belgaum News Animal Welfare Board
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..