बेळगावः धोकादायक इमारत हटविण्यासाठी गेलेला महापालिकेचा कर्मचारी झाला जखमी

मल्लिकार्जुन मुगळी
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

बेळगाव: येथील नार्वेकर गल्लीतील धोकादायक इमारत हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचा एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी अकरा वाजता घडली.

बुधाजी मेस्त्री असे त्या कर्मचार्याचे नाव आहे. त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. शिवाय, महापालिकेने ती इमारत हटविण्याची मोहीम तातडीने थांबविली.

नार्वेकर गल्लीत स्वाती अनगोळकर यांच्या मालकीची इमारत आहे. ती इमारत धोकादायक असल्याची इमारत महापालिकेला मिळाल्यानंतर बांधकाम विभागाने अतिक्रमण निर्मूलन पथकाला तेथे पाठविले. त्यांना धोकादायक इमारत पाडविण्याची सूचना देण्यात आली. पथकातील कर्मचारी बुधाजी मेत्री इमारतीच्या छतावर चढला होता, पण पत्र्यावरून पाय घसरून तो खाली पडला. यावेळी त्याच्या पाठीला व डोक्याला दुखापत झाली. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे निरीक्षक अर्जुन देमट्टी यानी तातडीने मेत्री याला तेथून बाहेर केले व प्रथमोपचार केले. इमारत खूपच धोकादायक असल्यामूळे व कर्मचारी जखमी झाल्यामुळे मोहिम रद्द करण्यात आली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण

Web Title: belgaum news The corporation employee was injured