"हालसिध्दनाथ"कडून 3151 रूपये पहिली उचल - प्रा. सुभाष जोशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

निपाणी - येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याने 2017-18 च्या गळीत हंगामातील गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन पहिली उचल 3 हजार 151 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. सुभाष जोशी यांनी शुक्रवारी (ता. 3) दिली. 

निपाणी - येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याने 2017-18 च्या गळीत हंगामातील गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन पहिली उचल 3 हजार 151 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. सुभाष जोशी यांनी शुक्रवारी (ता. 3) दिली. 

आज (ता. 3) झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने दराबद्दल एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे सांगून प्रा. जोशी म्हणाले, "कारखान्याचा 2017-18 मधील हंगाम 1 ऑक्‍टोबरपासून सुरु झाला असून आत्तापर्यंत 87 हजार 550 मेट्रीक टन ऊस गाळप केले आहे. गाळपातून 65 हजार 370 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यंदाच्या हगामात आत्तापर्यंत गाळप झालेल्या व गाळप होणाऱ्या उसाला ठरल्यानुसार 3 हजार 151 रुपयांप्रमाणे बिले दिली जातील. त्यामुळे सर्व ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस हालसिध्दनाथ कारखान्याला देऊन सहकार्य करावे."

बैठकीस आमदार गणेश हुक्केरी, व्हाईस चेअरमन अनिता पाटील, संचालक अप्पासाहेब जोल्ले, चंद्रकांत कोठीवाले, विश्‍वनाथ कमते, मलगोंडा पाटील, पप्पू पाटील, अविनाश पाटील, मल्लिकार्जुन पाटील, जयवंत कांबळे, बाबासाहेब खोत, विद्या गिंडे, समीत सासणे, रामगोंड पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. 

हालशुगरने दराची कोंडी फोडली

2017-18 च्या हंगामातील ऊस दरावरुन पेच निर्माण झाला असताना चिक्कोडी तालुक्‍यात श्री "हालसिध्दनाथ'ने सर्वप्रथम दर जाहीर करून त्याबद्दलची कोंडी फोडली आहे. तालुक्‍यातील अन्य कारखान्यांनी अद्याप दर घोषीत केलेले नाहीत. पहिली उचल 3 हजार 151 रुपयांची घोषणा केल्याने चेअरमन प्रा. सुभाष जोशी व संचालकांचे शेतकऱ्यांसह हितचिंतकांनी अभिनंदन केले. 

Web Title: Belgaum News Halisdhanath Rs. 3151 first Installment