लातूरमध्ये 3 सप्टेंबरला लिंगायत महामोर्चा होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कर्नाटक राज्यात लिंगायत धर्मसाठी विविध जिल्हात लिंगायत सभा आणि मोर्चा काढण्यात येत आहे. प्रत्येक सभेत लाखो लोक एकवटत आहेत. मठाधिश आणि स्वामी यांच्यासह राजकीय प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होत आहेत.

बेळगाव : लिंगायतला स्वतंत्र धर्मची मान्यता द्यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्यात मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधणाऱ्या लिंगायत समाजाचा मोर्चा येत्या 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील लातूर शहरात काढण्यात येणार असल्याची घोषणा बेळगाव येथील लिंगायत सभेत करण्यात आली.

कर्नाटक राज्यात लिंगायत धर्मसाठी विविध जिल्हात लिंगायत सभा आणि मोर्चा काढण्यात येत आहे. प्रत्येक सभेत लाखो लोक एकवटत आहेत. मठाधिश आणि स्वामी यांच्यासह राजकीय प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होत आहेत.

याच स्वरूपाचा मोर्चा लातूर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा बेळगावातील लिंगायत मैदान येथील सभेत केली आहे.  त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी गुलबर्गा येथे लिंगायत समाजाचा मोर्चा काढला जाणार आहे.

लिंगायत धर्मासाठी मोर्चाला सुरवात महासभेने
बेळगाव : लिंगायत जातीला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, या मागणीसाठी लिंगायत समाजातर्फे आज (ता 22) काढण्यात येणाऱ्या रॅलीपूर्वी महासभा आयोजित करण्यात आली. मोर्चासाठी हजारो लिंगायत बांधव एकत्र आले असून भव्य सभा सुरू झाली आहे.
नागनूर सिध्दरामस्वामी यांनी प्रास्तविक केले.

बेळगाव, राज्य आणि महाराष्ट्र येथून मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. लिंगराज कॉलेज मैदान येथे सकाळी दहा वाजता लोक जमण्यास सुरूवात झाली. दुपारी बारा वाजता सभेला सुरूवात झाली. अनेक मठाधिश व स्वामी सहभागी झाले आहेत.

Web Title: Belgaum news Lingayat community morcha