दुचाकी अपघातात एमबीबीएस विद्यार्थी ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

बेळगाव - ट्रकने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात कोल्हापुरात एमबीबीएस शिक्षण घेणारा विद्यार्थी ठार झाला. रविवारी (ता. 8) सायंकाळी पाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी क्रॉसवर ही घटना घडली. सुमित राय (वय 24, सध्या रा. कोल्हापूर, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत यमकनमर्डी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कोल्हापुरातील सीपीआर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण घेणारा सुमित राय व त्याची मैत्रीण नेहा दाणी रविवारी सकाळी नातेवाईकांच्या भेटीसाठी बेळगावला आले होते. नातेवाईकांची भेट सायंकाळी ते दुचाकीवरुन (एमएच 09, क्‍यूवाय 5411) कोल्हापूरला परतत होते. सुतगट्टी क्रॉसवर दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यात सुमित जागीच ठार झाला आहे. तर नेहा जखमी झाली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर यमकनमर्डीसह काकती स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, हा अपघात यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यमकनमर्डी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तर जखमी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यमकनमर्डी पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Belgaum news MBBS student died in an accident