अपघातात निपाणीचा युवक ठार

राजेंद्र हजारे
मंगळवार, 29 मे 2018

निपाणी - पुणे येथे दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निपाणीचा युवक ठार झाला. श्रीनिधी अरूण फुंडीफल्ले (वय 28, रा. इटेकरी गल्ली, निपाणी) असे त्याचे नाव आहे.

निपाणी - पुणे येथे दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निपाणीचा युवक ठार झाला. श्रीनिधी अरूण फुंडीफल्ले (वय 28, रा. इटेकरी गल्ली, निपाणी) असे त्याचे नाव आहे.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी, श्रीनिधी फुंडीफल्ले हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. कार्यालयातील काम संपवून रविवारी (ता. 27) सायंकाळी घरी परतत असताना दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये श्रीनिधी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी (ता. 28) सायंकाळी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. मंगळवारी (ता. 29) निपाणी येथे मृतदेह आणल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. फुंडीफल्ले दांपत्याला श्रीनिधी हा एकुलता मुलगा असल्याने या कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Web Title: Belgaum News one dead in pune in accident