साठे साहित्य संमेलन अध्यक्षपदी पंडित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

बेळगाव -  बेळगावात डिसेंबरमध्ये आयोजित आठव्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. माया पंडित यांची, तर उद्‌घाटकपदी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व विचारवंत डॉ. जब्बार पटेल यांची निवड केली आहे, अशी माहिती रविवारी (ता. १७) झालेल्या बैठकीत देण्यात आली.

बेळगाव -  बेळगावात डिसेंबरमध्ये आयोजित आठव्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. माया पंडित यांची, तर उद्‌घाटकपदी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व विचारवंत डॉ. जब्बार पटेल यांची निवड केली आहे, अशी माहिती रविवारी (ता. १७) झालेल्या बैठकीत देण्यात आली.

साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत रविवारी (ता. १७) मराठी विद्यानिकेतनमध्ये कार्यकारिणीची बैठक झाली. प्रा. डॉ. संध्या देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी त्यांनी संमेलनाच्या अध्यक्ष, उद्‌घाटक आणि सत्रांबाबत माहिती दिली. संमेलनाध्यक्षपदी हैदराबादमधील भाषा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माया पंडित यांची, तर उद्‌घाटक म्हणून ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक, विचारवंत जब्बार पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात एकूण चार परिसंवाद होणार आहे. एक विशेष व्याख्यान होणार आहे.

एका सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून, पहिल्या दिवशी शाहीरी जलसा होणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे शाहीर सदाशिव निकम, सातारच्या शीतल साठे यांचा समावेश आहे. स्थानिक कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचाही कार्यक्रम घेण्यात येणार आहे. उद्‌घाटनाच्या सत्रात बेळगावातील मान्यवर शाहीरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. बैठकीला माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रा. डॉ. आनंद मेणसे, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, अनिल आजगावकर, तुकाराम बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, भाई देशपांडे, आनंद कानविंदे, कला सातेरी, अप्पाजी पाटील, अप्पाजी मोरे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.

 

Web Title: Belgaum News Sathe Sahitya Sammelan