बेळगावात सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

संजय सूर्यवंशी
बुधवार, 18 एप्रिल 2018

बेळगाव -  विश्वेश्वरय्या नगर मधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वार्टर्समध्ये बनावट नोटा आढळून आल्या. दोन हजार व पाचशे रुपये मूल्याच्या या नोटा आहेत. अनेक नोटांवर 2000 व  500 ऐवजी चार शून्य आहेत.

बेळगाव -  विश्वेश्वरय्या नगर मधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वार्टर्समध्ये बनावट नोटा आढळून आल्या. दोन हजार व पाचशे रुपये मूल्याच्या या नोटा आहेत. अनेक नोटांवर 2000 व  500 ऐवजी चार शून्य आहेत.

अनेक बंडलमध्ये खालच्या व वरच्या बाजूला काही नोटा ठेवून  मधल्या भागात नोटांच्या आकाराचे कागद आहेत. त्यामुळे या नोटा नेमक्या किती याबद्दल अद्याप पोलिसांना ही खात्री नाही. तरीही प्राथमिक माहितीनुसार सात कोटींच्या बनावट नोटा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

विश्वेश्वरय्या नगर मधील बांधकाम खात्याच्या क्वार्टर्समध्ये बनावट नोटा आणून ठेवल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. डी सी राजप्पा यांना मिळाली. त्यांनी सोबत डीसीपी सीमा लाटकर, एस बी पाटील, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश हानापूर, सीसीबीचे निरीक्षक चंद्रकांत यांना सोबत घेऊन छापा टाकला असता येथे बनावट नोटा आढळून आल्या.

बहुतांशी नोटांवर दोन हजार पाचशेच्या आकड्याऐवजी चार शून्यच दिसून येतात. अनेक बंडल मध्ये खालच्या  वरच्या बाजूला चार चार नोटा लावून मधे नोटांच्या आकाराचे पांढरे कागद आहेत.

नोटांसोबत पोलिसांनी पांढरे कागदही जप्त केलेले आहेत. या नोटा ग्रामीण भागात निवडणुकीत वाटण्यासाठी आणल्या असल्याचा संशय व्यक्त करत केला जात आहे. जर या नोटा वाटण्यासाठी आणल्याअसतील तर त्यावर फक्त शून्याचा उल्लेख कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर पोलिसही शोधत आहेत. आतापर्यंत केलेल्या मोजणीनुसार 500 मूल्याच्या 25 हजार 300, तर 2000 मूल्याच्या 29 हजार 300 नोटा असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत अद्याप पोलिसांनी पूर्ण माहिती दिलेली नसून सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पोलिस आयुक्त डॉ. राजप्पा याबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे.

Web Title: Belgaum News Seven crore rupees fake currency seized