निपाणीजवळ अनोळखी व्यक्तीचा खून 

राजेंद्र हजारे
रविवार, 22 जुलै 2018

निपाणी - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गवाणी क्रॉसवजळ अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळला आहे.  धारदार शस्त्रासह तोंडात बोळा घालून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ​

निपाणी - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गवाणी क्रॉसवजळ अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळला आहे.  धारदार शस्त्रासह तोंडात बोळा घालून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही घटना रविवारी (ता. 22) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे निपाणी परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. चिक्कोडीचे पोलिस उपअधिक्षक दयानंद पवार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. 

तवंदी घाट प्रारंभ होण्यापूर्वीच गवाणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओहोळीमध्ये रविवारी पहाटे अनोळखी व्यक्तिचा मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. तात्काळ फौजदार निंगनगौडा पाटील, सहाय्यक फौजदार एम. जी. निलाखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मृतदेहाच्या मानेसह कपाळावर रक्ताचे डाग दिसून आले आहेत. शिवाय मृतदेहाच्या तोंडात बोळा कोंबल्याचेही स्पष्ट झाले आहे. अन्यत्र खून करून हा मृतदेह या परिसरात टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही व्यक्ती परराज्यातील असण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी मृतदेहाची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल केली आहेत. 

मृत व्यक्तीच्या माहितीसाठी या भागातील पोलिस महाराष्ट्राच्या हद्दीत तपासासाठी रवाना झाले आहेत. मृतदेहाच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट व आतील बाजूस तांबड्या रंगाचे बनियन आहे. हा मृतदेह 45 ते 50 वयाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

Web Title: Belgaum News stranger murder near Nipani