बेळगावात दोन तासांत दोघांची रेल्वेखाली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

तिरूपती कोल्हापूरकडे जाणाऱ्या हरिप्रिया एक्‍स्प्रेससमोर शिवानंद यांनी स्वतःला झोकून दिले. यामध्ये ते जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. संबंधिताचे अवयव विखुरले असल्यामुळे त्याची लवकर ओळख पटत नव्हती

बेळगाव - अवघ्या दोन तासांत पहिल्या ते तिसऱ्या रेल्वे फाटकाच्या किलोमीटरच्या अंतरात महिलेसह दोघांनी रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली. शिवानंद ओबय्या गोरगी (50, रा. पिरनवाडी) यांनी बाराच्या सुमारास तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळ आत्महत्या केली. मानसा दुरदुंडेप्पा मदवाल (26, रा. अडव्याप्पाची अंकलगी, ता. गोकाक) या विवाहितेने दुपारी दोनच्या सुमारासा पहिल्या रेल्वे फाटकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली.

आज सकाळी बाराच्या सुमारास तिरूपती कोल्हापूरकडे जाणाऱ्या हरिप्रिया एक्‍स्प्रेससमोर शिवानंद यांनी स्वतःला झोकून दिले. यामध्ये ते जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. संबंधिताचे अवयव विखुरले असल्यामुळे त्याची लवकर ओळख पटत नव्हती. तीन तासांच्या प्रयत्नानंतर सदर व्यक्तीची ओळख पटली. 

...तर दुसरी आत्महत्या 
पुरूषाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक बी. टी. वालीकर व त्यांच्या सहकाऱ्यानी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाकडे घेऊन गेले. ही सर्व प्रक्रीया पार पडेपर्यंत दोन वाजले होते. यावेळी उपनिरीक्षकांना येथेच फोन आला की पहिल्या रेल्वे फाटकाजवळ अरुण थिएटरच्या समोरील बाजूस एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. येथे काही पोलिसांनी थांबवून ते पुन्हा सहकाऱ्यांसह येथे आले. रूळावर डोके आदळून सदर महिलेचे डोके फुटून ती जागीच ठार झाली. हिची जेव्हा ओळख काढली तेव्हा ही महिला अडव्याप्पाची अंकलगी येथील असल्याचे समजले. घरातील किरकोळ भांडणातून मानसिक अस्वस्थ होऊन ती बेळगावला आली होती. या ठिकाणी तिने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही घटनांची रेल्वे पोलिसांत नोंद झाली असून, उपनिरीक्षक बी. टी. वालीकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: belgaum news: two suicides in two hour