बेळगाव : वीजपुरवठा खंडित; उत्पादनांना अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 light bill

बेळगाव : वीजपुरवठा खंडित; उत्पादनांना अडथळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव ः औद्योगिक वसाहत ही पूर्णतः विजेवर चालते; मात्र या ठिकाणी अनेकवेळा वीज गायब होते. यामुळे उद्योजकांना मोठा फटका सहन करावा लागतो. अचानक वीज गेल्यामुळे उद्योजकांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागते. यामुळे त्यांच्या आर्थिक तोट्यात भर पडत आहे. अवघी १० मिनिटे वीज गेली तरीही लघु उद्योजकांसह मोठ्या उद्योजकांना आर्थिक फटका बसत आहे.

कोरोना काळात काही महिने औद्योगिक वसाहत पूर्णपणे बंद होती. तरीही लघु व मोठ्या उद्योजकांना हेस्कॉमचे लाखो रुपयांचे वीज बिल अादा करावे लागले. सध्या मोठ्या उद्योजकांकडे जनरेटर आहेत. मात्र, लघु उद्योजकांकडे जनरेटर नाहीत. त्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यांना काम बंद ठेवावे लागते. तर अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत राहिल्यास उत्पादन प्रक्रियेतही अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका मोठ्या उद्योजकांसह लघु उद्योजकांनाही सहन करावा लागत आहे. बेळगाव शहर व आसपास असलेल्या औद्योगिक वसाहतीतील तयार माल विविध राज्यासह परदेशात जातो. यामुळे माल दर्जेदार होणे आवश्‍यक आहे. यासाठी विविध अत्याधुनिक मशिनचा वापर या ठिकाणी केला जातो. अनेक वेळा अचानक वीज काढली जाते. त्यामुळे ती लोखंडी वस्तू मशिनमध्येच राहते. यातून ती वस्तू स्क्रॅप होण्याचा धोका अधिक असतो.

येथील औद्योगिक वसाहतीत फाऊंड्री व मशिनशॉपची संख्या मोठी आहे. अचानक वीज गेल्यास फाऊंड्री व मशिनशॉप असलेल्या उद्योजकांचे मोठे नुकसान होते.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

उद्योगांपुढील आव्हाने

पथदीपांची समस्या नित्याचीच

उद्यमबाग वसाहतीत २४ तास तीन शिफ्टमध्ये काम चालते. यामुळे रात्रीच्या वेळीही कामगारांची ये-जा सुरू असते. उद्योजकांच्या मागणीनंतर उद्यमबाग वसाहतीत सुमारे २४६ पथदीप बसविण्यात आले आहेत; मात्र अजूनही काही ठिकाणी पथदीप बसविणे आवश्‍यक आहे. पथदीपांसंबंधी महापालिकेकडे तक्रार केली असता हेस्कॉमकडे तक्रार करण्यास सांगितले जाते. तर हेस्कॉम महापालिकेकडे बोट करत आहे. त्यामुळे एकमेकांकडे तक्रार करून उद्योजक वैतागले आहेत.

loading image
go to top