बेळगाव : RTE च्या जागा दुसऱ्या वर्षीही रिक्त

केवळ १२३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
rte
rtesakal

बेळगाव : आरटीईच्या जागा सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आतापर्यंत फक्त १२३ विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंतचा सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या २५ टक्के जागा सलग दुसऱ्या वर्षी भरती झालेल्या नसून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. आरटीइच्या जागा रिक्त राहत असल्याने शिक्षण खात्याने प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. त्यामुळे अधिक प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. मात्र, प्रवेशाची यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला असून शिक्षण खात्याच्या माहितीनुसार आतापर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत फक्त १२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. दरवर्षी अशाच प्रकारे कमी प्रतिसाद मिळाला तर येणाऱ्या काळात आरटीई प्रवेश प्रक्रिया कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

आरटीईला दरवर्षी कमी प्रतिसाद मिळू लागला असून २०२२ - २३ च्या शैक्षणिक वर्षासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४१ शाळांमध्ये २५ टक्के आरटीईसाठी जागा उपलब्ध होत्या. तसेच अर्ज करण्यासाठी ३ वेळा वाढीव मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्याकडे अनेक पालकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

आरटीईचा नवीन नियम लागू होण्यापूर्वी आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते याची पालक वाट पाहत होते, मात्र शिक्षण खात्याने आरटीईचा परिणाम सरकारी शाळांवर होत असल्याचे कारण पुढे करीत आरटीईसाठी घरापासून दीड किलो मीटर परिघाचा नियम लागू केल्यापासून आरटीई प्रवेशाची क्रेझ कमी झाली असून पालकांना आपल्या परिसरात सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा नसेल तरच इतर भागातील खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल करता येतो. मात्र या नियमामुळे आरटीई प्रवेशावर मोठा परिणाम झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com