
बेळगाव : शिक्षक भरती डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार
बेळगाव : पदवीधर शिक्षकांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. त्यामुळे, शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिक्षण खात्याने सहावी ते आठवीसाठी राज्यात पदवीधर शिक्षकांच्या १५ हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मे महिन्यात सीईटी घेण्यात आली होती. राज्यातील हजारो उमेदवारांनी सीईटी दिली होती. या परीक्षार्थींचे लक्ष सध्या निकालाकडे लागले आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व १५ हजार जागा भरण्यासाठी काउन्सेलिंग प्रक्रिया राबविली जाणार आहे. यापैकी पाच हजार जागा कल्याण कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये भरल्या जाणार आहेत. उर्वरित दहा हजार जागा राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये भरल्या जातील. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ८७ जागांचा समावेश आहे.
राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्या तरी फक्त १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे, अजूनही अनेक शाळांना अतिथी शिक्षकांवर अवलंबून राहावे लागत आहे.
Web Title: Belgaum Teacher Recruitment Completed By December
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..