बेळगाव : सन्मान रणरागिणींच्या कर्तृत्वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रणरागिणींच्या कर्तृत्वाचा

बेळगाव : सन्मान रणरागिणींच्या कर्तृत्वाचा

कोल्हापूर: बेळगावला राणी चन्नम्मा यांच्या शौर्यशाली पराक्रमाचा इतिहास आहे. हाच वारसा येथील रणरागिणी आता सर्वच क्षेत्रात नेटाने पुढे नेत आहेत. त्यांच्या यशकथा नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या असल्याचे गौरवोद्‌गार जीएसटी विभागाच्या सहआयुक्त सुनीता थोरात यांनी काढले. ‘सकाळ’तर्फे ‘वूमन इन्फ्लूएन्सर्स’ ॲवॉर्ड वितरणाचा दिमाखदार सोहळा बुधवारी (ता. ११) हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये रंगला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव, ‘स्मार्ट सोबती’च्या संपादक सुरेखा पवार, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे व्यासपीठावर होते.

त्या पुढे म्हणाल्या,

बातम्यांच्या पलीकडेही ‘सकाळ’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील विधायक गोष्टींना प्राधान्य देत लोकसहभागातून अनेक उपक्रम यशस्वी करून संपूर्ण राज्याला आदर्श दिला. शिरोळमधील महापुरात जमीनदोस्त झालेल्या शाळांची पुन्हा उभारणी करणे असो किंवा काश्मीरमधील गाव दत्तक घेऊन त्याची पुन्हा उभारणी करणे असो, या गोष्टी नक्कीच कौतुकास्पद आहेत. महिलांसाठी ‘तनिष्का’सारखे व्यासपीठ निर्माण करून अनेक उपक्रम यशस्वी केले. ‘वूमन इन्फ्लूएन्सर्स’ ॲवाॅर्डच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रातील रणरागिणींना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा केलेला गौरव सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतील सोयराबाई, अभिनेत्री उर्मिला जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘सकाळ’ नेहमीच समाजातील विधायक गोष्टींना प्रोत्साहन देतो. विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकांच्या सहभागातून प्रयत्न करतो. एकूणच हा सारा प्रवास पाहिल्यास ‘सकाळ’ माध्यम समूह सामाजिक परिवर्तनाचे एक केंद्रच बनल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

राजर्षी शाहू महाराजांनी महिला सन्मानासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करत असताना होत असलेला हा पुरस्कार वितरणाचा सोहळा नक्कीच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. उद्योग, शिक्षण, राजकारण, शेती, संरक्षण दल अशा अनेक अाघाडीवर महिला काम करीत आहेत. केवळ शहरच नव्‍हे तर ग्रामीण भागातील महिलांनाही अनेक क्षेत्रात झेप घेतली आहे. त्‍यांच्‍यामुळे कुटुंबांचा सर्वांगीण विकास होत आहे. त्‍यामुळेच याची साऱ्यांनाच प्रचिती आली आहे, असे ‘केसरी’ फेम अभिनेता विराट मडके यांनी सांगितले.ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. रुद्रम बॅंडचे शुभम साळोखे, रोहित सुतार यांच्या बॅंडने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

विधायक बदलांसाठी ‘सकाळ’ आग्रही श्रीराम पवार

‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, सकाळ माध्यम समूह समाजातील विधायक बदलांसाठी आग्रही असून त्यासाठी विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले. विविध क्षेत्रात आता महिला व मुलींनी पुरुषांच्याही पुढे जाऊन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचा योग्य सन्मान व्हावा आणि त्याचबरोबर त्यांच्या यशकथेतून नव्या पिढीने आदर्श घेतला तर त्यांनाही आपापल्या क्षेत्रात करिअरसाठी वेगळी दिशा मिळेल, या उद्देशाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले. महिला सन्मानासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणाऱ्या राजर्षी शाहूंच्या भूमीतील या सोहळ्याला यंदाच्या राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी वर्षाची झालर लाभली आहे आणि ती सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे.

Web Title: Belgaum Women Influencers Ranaraginis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top