नगरपरिषदेच्या मिळकत पत्रिकेवर लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळावा

चंद्रकांत देवकते
बुधवार, 18 जुलै 2018

मोहोळ(सोलापूर) - नगरपरिषदेने देण्यात आलेल्या मिळकत पत्रिकेच्या आधारावर रमाई घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक तथा राज्य सचिव निर्मला बावीकर यांनी पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हेसेकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.

मोहोळ नगरपरिषदेच्या अंतर्गत रमाई आवास योजनेकरिता सन २०१६-१७ या कालावधीत १९८ मागासवर्गीय लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. मंजुरी अंती दीड वर्ष होऊन ही प्रशासन घरकुलाबाबत अनभिज्ञ होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने यशोदा कांबळे यांनी विविध स्वरुपाची आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्याने घरकुलाचा प्रलंबित विषय मार्गी लावला.   

मंजुर १९८ घरकुलापैकी ज्या लाभार्थ्याकडे सात बारा उतारा व भुमी अभिलेख कार्यालयाचा उतारा आहे. अशा सुमारे ५० ते ६० घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंरतु, ज्या लाभार्थ्याकडे सात बारा उतारा किंवा भुमि अभिलेखाचा उतारा नाही. पंरतु, त्यांच्याकडे नगरपरिषदेचा मिळकत उतारा आहे. त्या ठिकाणी सुमारे ३० ते ४० वर्षापासुन वाडवडिल राहत आहेत. मात्र  उताऱ्यांची तांत्रिक अडचण अनिवार्य असल्याचे पुढे करीत इतर सर्व सामान्य मागासवर्गीय घरकुल लाभार्थी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा लालफितीचा प्रयत्न आहे. तरी या उपेक्षीत लाभार्थ्याना हक्काचा निवारा व्हावा याकरीता सरसकट नगरपरिषदेने दिलेले मिळकत पत्रिका असेसमेंट उतारा ग्राह्य धरुन लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा व घरकुलापासून एक ही लाभार्थी वंचित राहू नये अशी मागणी आयुक्ता कडे केली आहे. याबाबत आयुक्तांचा संबधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क झाला असुन, सकारात्मक मार्ग निघेल अशा आशावाद निर्मल बावीकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Beneficiaries will receive the benefit of the house rent on the Municipal Council's property sheet