लाभाच्या वस्तूंबाबत पुन्हा संदिग्धता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सोलापूर - सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा लाभ वस्तू स्वरूपात न देता त्याचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या निधीच्या बाबतीत नऊ जानेवारीला ग्रामविकास विभागाने काढलेला आदेश संदिग्ध असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.

वस्तू स्वरूपात अनुदान न देता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने पाच डिसेंबरला घेतला आहे. कोणतीही लाभाची वस्तू अगोदर त्या लाभार्थ्याने स्वतःच्या पैशातून खरेदी करायची. वस्तूची खरेदी केल्यानंतर त्याची पावती संबंधित विभागाकडे सादर केल्यानंतर त्याचे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या आदेशामुळे मार्चपूर्वी सेस फंडाचा निधी खर्च होण्याबाबत जिल्हा परिषदेसमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्याबाबत राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार ग्रामविकास विभागाने नऊ जानेवारीला एक आदेश काढला आहे. त्या आदेशामध्ये मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत काहीही स्पष्टता दिलेली नाही.

लाभार्थ्यांची चेष्टा
मागासवर्गीय लाभार्थ्यांनी स्वतः वस्तू खरेदी करण्याऐवजी त्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा करावेत. त्यानंतर ठराविक दिवसांनी संबंधित लाभार्थ्यांनी ती वस्तू खरेदी केली किंवा नाही याबाबत खात्री करावी, अशा प्रकारचे प्रस्ताव जिल्हा परिषदांनी सरकारकडे दिले होते. मात्र, ग्रामविकास विभागाने पुन्हा एकदा संदिग्ध आदेश काढून लाभाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे निधी अखर्चित राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Web Title: The benefit of the ambiguity goods